Pramod Nana Bhangire | अखेर 5 कोटीचा निधी मंजूर,मुंढवा ते केशव नगर रस्त्यावर मुख्य चौकात भूमिगत मार्गाला महानगरपालिकेची मंजुरी !

0

शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या प्रयत्नास यश

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pramod Nana Bhangire | आठ दिवसात हडपसरची वाहतूक कोंडी सुटली नाही तर महापालिका आयुक्तांच्या कक्षाला टाळे ठोकू असा थेट इशारा शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी दिल्यानंतर महानगरपालिकेने 5 कोटीचा निधी मंजूर केला.

हडपसर, मुंढवा, केशवनगर व मांजरी या भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून हडपसरकर नागरिकांच्या दैनंदिन जीवनात प्रवास करतांना तासनतास आपला वेळ ट्रॅफिकमध्ये वाया घालवावा लागत आहे. प्रशासनाला याबाबत वारंवार सूचना देऊनही प्रशासन याबाबत कोणताही ठोस असा निर्णय घेत नव्हते त्यामुळे महात्मा फुले चौक, मुंढवा येथे शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली हजारो शिवसैनिक व स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत डिसेंबर महिन्यात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.(Pramod Nana Bhangire)

मुंढव्यातील महात्मा फुले चौकापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौक व रेणुकामाता मंदिर, केशवनगर या रस्त्यावर सद्याच्या घडीला खुप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. दररोज नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. म्हणूनच येथील वाहतूक व्यवस्थेचे सुरळीत नियोजन करण्यासाठी, महानगरपालिकेने केशवनगर ते मांजरी पर्यंत जिथे उड्डाणपूल आहे तिथे अंडरपास करावा तसेच येथील अतिक्रमण काढून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे या मागणी साठी डिसेंबर महिन्यात महात्मा फुले चौक, मुंढवा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.

रस्ता रोको केल्यानंतर काही शिवसैनिकांनी आंदोलनस्थळी एक रुग्णवाहिका आणून कश्याप्रकारे या वाहतूक कोंडीमध्ये एखाद्या रुग्णाचे प्राण जाऊ शकतात, याचा जिवंत देखावा प्रशासनाला दाखवून दिला होता. तसेच आंदोलनस्थळी बोलताना, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले होते की “येथील स्थानिक नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असून संपूर्ण हडपसर हे वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडले आहे, पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाला यासंबंधी निवेदन देवूनही, प्रशासन याविषयी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोणतेही नियोजन करत नाही. त्यामुळे पुढील आठ दिवसात केशवनगर मांजरीचा अंडरपास करण्याचा निर्णय महानगरपालिकेच्या बैठकीत घेण्यात आला नाही, तर आयुक्तांच्या कक्षाला टाळे ठोकू” अशा पद्धतीचा थेट इशाराच दिला होता.

या परिसरात असणाऱ्या IT कंपन्या या ट्रॅफिकच्या त्रासाला कंटाळून स्थलांतरित करण्याच्या विचारात आहेत.
त्यामुळे येथील नागरिकांना खुप मोठ्या प्रमाणात फटका पोहचू शकतो.
आणि म्हणून येणाऱ्या भविष्याची जाण ठेऊन लोकप्रतिनिधी व प्रशासना विरोधी डिसेंबर महिन्यात शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्याकडून रस्तारोको आंदोलन करण्यात आले होते. यावेळी हजारो शिवसैनिक व हडपसर भागातील शेकडो स्थानिक नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. व प्रशासनाविरोधी घोषणाबाजी करण्यात आली होती.

यावेळी महापालिका उपायुक्त श्री. काटकर यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन,
शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी मागणी केलेल्या प्रश्नावर,
तातडीचे बैठक घेण्यासंबंधी निर्देशित केल्यानंतर रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले होते.
अखेर महानगरपालिकेने येत्या अर्थसंकल्पात मुंढवा ते केशव नगर मुख्य रस्त्याच्या
भुयारी मार्गाला 5 कोटी रुपयांची मंजुरी दिली.यासाठी महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार,
अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांचे मनापासून आभार मानतो.

Siddhesh Ramdas Kadam | रामदास कदमांची काल भाजपावर टीका, आज सरकारने मुलाला दिलं मोठं पद! पण नियम मोडल्याची चर्चा

Leave A Reply

Your email address will not be published.