Pune Pimpri Chinchwad Crime News | महिला पोलिसाला महिलेकडून मारहाण, पुण्यातील अप्पर पोलीस आयुक्त कार्यालयातील प्रकार

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | तक्रार अर्जाचा अहवाल वाचून दाखवत असताना अहवाल मनाप्रमाणे नसल्याच्या कारणावरुन एका महिलेने महिला पोलीस हवालदाराला (Female Police Constable) मोबाईल फेकून मारत धक्काबुक्की केली. हा प्रकार सेंट्रल बिल्डींग येथील अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग यांच्या कार्यालयात (Addl CP Office) सोमवारी (दि.18) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी महिलेवर गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत महिला पोलीस हवालदार राखी योगेश खवले Rakhi Yogesh Khawle (नेमणूक-पोलीस मुख्यालय, शिवाजीनगर, पुणे) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundagarden Police Station) फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी श्वेता प्रमोद कदम Shweta Pramod Kadam (रा. सिद्धार्थ नगर, येरवडा गावठाण, पुणे) हिच्यावर आयपीसी 353, 332, 186, 506 नुसार गुन्हा दाखल करुन अटक (Arrest) केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने दिलेल्या तक्रार अर्जाच्या अनुशंगाने अपर पोलीस आयुक्त यांना
सहायक पोलीस आयुक्त खडकी (ACP Khadki) यांनी अहवाल पाठवला होता.
अहवाल पाहून फिर्यादी राखी खवले या अर्जदार (आरोपी महिला) यांना सांगत होत्या.
त्यावेळी आरोपी महिलेने हा अहवाल मनाप्रमाणे नसल्याच्या कारणावरुन गोंधळ घालून आरडाओरडा केला.

त्यावेळी महिलेला कार्यालयातून बाहेर जाण्यास सांगितले. याचा राग आल्याने तिने तिच्या हातातील मोबाईल राखी
खवले यांच्या डोक्यात फेकून मारून त्यांना धक्काबुक्की केली. तसेच पाहून घेण्याची धमकी दिली.
महिलेला बंडगार्डन पोलीस ठाण्यात नेण्यात आले त्यावेळी देखील तिने तेथील पोलीस अंमलदार यांच्यासोबत झटापट
करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तांगडे (PSI Tangde) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.