Pune Pimpri Crime News | तळेगाव दाभाडे : नातवंडांना भेटण्यासाठी भावाने मागितली बहिणीकडे दीड कोटींची खंडणी

Extortion Case

तळेगाव दाभाडे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन –Pune Pimpri Crime News | नातवंडांना भेटण्यासाठी गेलेल्या बहिणीकडे लहान भावाने दीड कोटी रुपयांची खंडणी (Extortion Case) मागितली. तसेच पैसे दिले नाहीतर धारावी झोपडपट्टीमधील पोरांना आणून जीवे मारण्याची धमकी (Threats to kill) दिली. याप्रकरणी मुंबईतील धारावी येथील दोघांवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 2 नोव्हेंबर रोजी घडली. (Pune Pimpri Crime News)

सुरेश पांडुरंग शिंदे, एक महिला (रा. शास्त्रीनगर, धारावी, मुंबई) यांच्यावर आयपीसी 384, 385, 323, 506, 504, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिलेने शनिवारी (दि. 25) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांच्या मुलाचे त्यांच्या लहान भावाच्या मुलीसोबत लग्न झाले आहे. त्यांना दोन लहान मुले आहे. फिर्यादी यांची सून लहान मुलांना घेऊन तिच्या वडिलांकडे राहते. त्यामुळे फिर्यादी या नातवंडांना भेटण्यासाठी भावाच्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी भावाने नातवंडांना भेटण्यासाठी व त्यांना पुन्हा आपल्या घरी न्यायचे असेल
तर दीड कोटी रुपये द्यावे लागतील, असे म्हणत खंडणी (Ransom Case) मागितली.
दीड कोटी रुपये दिले नाही तर धारावीमधील पोरांना आणून मारून टाकण्याची धमकी दिली.
तसेच शिवीगाळ करुन मारहाण (Beating) केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा