Sambhaji Bhide Guruji | पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाजी भिंडेंना पोलिसांनी बजावली नोटीस

0

पुणे : Sambhaji Bhide Guruji | संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पुणे शहरात दाखल होणार आहे. या पालखी सोहळ्यात संभाजी भिडे असंख्य धारकऱ्यांसोबत सहभागी होतात. यात वारकरी आणि धारकऱ्यांमध्ये वादाचे प्रकार घडले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संभाजी भिडे यांना नोटीस बजावली आहे.

दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे हे पालखी सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी आले आहेत. तर त्यापूर्वी संभाजी भिडे शिवाजीनगर भागातील जंगली महाराज येथे आले असून सोबत असंख्य धारकरी आहेत.

तुकाराम महाराज पालखी दर्शनाच्या वेळी कायदा सुव्यस्था बिघडणार नाही त्याबाबत काळजी घ्या तसेच तेढ निर्माण करणारे भाषण करु नका अशा स्वरूपाची नोटीस पुणे पोलिसांमार्फत संभाजी भिडे यांना बजावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.