Yerawada Pune Crime News | पुणे: तरुणावर कोयत्याने वार करुन घरातील सामानाची तोडफोड, येरवडा परिसरातील घटना

0

पुणे : Yerawada Pune Crime News | घराबाहेर मोठ मोठ्याने गोंधळ घालून एका तरुणावर कोयत्याने सपासप वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली. ही घटना शुक्रवारी (दि.28) दुपारी दोनच्या सुमारास जयप्रकाश नगर येथे घडली आहे. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अविष्कार राजेश पतंगे (वय-20 रा. सकट गिरणी जवळ, जयप्रकाश नगर, येरवडा) याने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे.

यावरुन सुरज कांबळे, प्रेम कांबळे, अभिजीत मिसाळ यांच्यावर आयपीसी 324, 323, 427, 504 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा भाऊ घरात झोपले असताना आरोपी फिर्य़ादी यांच्या घरासमोर आले. आरोपींनी फिर्यादी यांच्या घरासमोर मोठ मोठ्याने गोंधळ करुन आव्याची गाडी फोडा असे म्हणत शिवीगाळ केली. आरोपींचा आवाज ऐकून फिर्य़ादी व त्यांचा भाऊ अभय बाहेर आले. त्यावेळी आरोपीने त्याच्या हातातील कोयत्याने अविष्कार याच्या हातावर, छातीवर, बरगडीवर वार करुन जखमी केले. तसेच घरात घुसून सामानाची तोडफोड करुन गाडी ढकलून नुकसान केलं. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

भाई झाला का म्हणून चाकूने वार

पुणे : तु काय भाई आहे का? थांब तुला बघतोच असे म्हणून एका युवकावर चाकूने मारुन जखमी केले. हा प्रकार 26 जून रोजी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास सिद्धिविनायक सोसायटी, आंबेगाव खुर्द येथे घडली आहे. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या बाबत अमर विलास बायस (वय-34 रा. सिद्धिविनायक सोसायटी, आंबेगाव खुर्द) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्य़ाद दिली आहे.

या प्रकरणी संभाजी शिंदे व ज्ञानेश्वर गोरड व इतर दोन जणांवर आयपीसी 324, 323, 2452, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी संभाजी शिंदे याने अमर बायस याच्या मोबाईलवर फोन केला. तु माझे दाजी ज्ञानेश्वर गोरड यांना डोस का देतो? मला तुला भेटायचे आहे, मी तुझ्या घरी येतो असे म्हणून आरोपी फिर्यादीच्या घरी आले. त्यांनी तु काय भाई आहे काय थांब तुला बघतोच असे म्हणून चाकूने वार केले. यामध्ये अमर बायस जखमी झाले आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.