SPPU News | वुफेंग विद्यापीठाची पुणे विद्यापीठाच्या आशय पत्रावर स्वाक्षरी

0

पुणे : SPPU News | तैवानमधील वुफेंग विद्यापीठाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आशय पत्रावर ( Letter Of Intent (LOI)) शुक्रवारी (२८ जून २०२४) स्वाक्षरी केली. कुलगुरू कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा. (डॉ) पराग काळकर, विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव आणि आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक प्रा. (डॉ) विजय खरे, वुफेंग विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. हंग- युंग तसाई, उपाध्यक्ष श्री. जॅक ली, आंतरराष्ट्रीय आणि क्रॉस स्ट्रेट अफेयर्स सेंटरचे संचालक रिटा हंग, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य श्री. रविद्र शिंगणापूरकर, डॉ. संदीप पालवे, आदी उपस्थित होते.

वुफेंग विद्यापीठाच्या शिष्टमंडळाने आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला भेट दिली. यावेळी त्यांनी आशय पत्रावर ( Letter Of Intent (LOI)) स्वाक्षरी करत शैक्षणिक आणि प्रशासकीय बाबींची देवाणघेवाण करण्यासंबंधी चर्चा केली. आज झालेल्या आशय पत्रावरील स्वाक्षरीमुळे हे दोन्ही विद्यापीठ एकमेकांची कार्यप्रणाली जाणून घेऊन त्यांच्या विस्तारीकरणावर भर देणार आहेत. यांतर्गत विद्यार्थी, शिक्षक आणि इतर प्रशासकीय कर्मचाऱ्यांची देवाणघेवाण करण्यासंबंधी फ्रेमवर्क तयार करण्यात येणार आहे. तसेच उपलब्ध सुविधा आणि संसाधनांचे आदानप्रदान करण्यावरही भर देण्यात येणार आहे. याशिवाय यांतर्गत विविध चर्चासत्र, परिषद आणि कार्यशाळांचेही आयोजन करण्यात येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.