SPPU News | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 124 वा पदवी प्रदान समारंभ 3 जुलैला

0

7125 विद्यार्थ्यांना मिळणार पदवी प्रमाणपत्र

पुणे – SPPU News | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १२४ वा पदवी प्रदान समारंभ ३ जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतपाटील सन्माननीय अतिथी व अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) अध्यक्ष प्रा. टी. जी. सीताराम हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी , प्र-कुलगुरू प्रा.(डॉ.) पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. (डॉ.) विजय खरे आणि परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांच्यासह विद्यार्थी व विविध मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. यावेळी ऑक्टो / नोव्हें., २०२३ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विविध विद्याशाखांमधील पदवी व पदव्युत्तर स्तरावरील ७,१२५ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहेत.

विद्यापीठाच्या इनडोअर हॉलमध्ये दुपारी १२.३० वाजता होणाऱ्या या समारंभात ४ हजार ८१४ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र, २ हजार २० विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र, ३५ विद्यार्थ्यांना पदविका प्रमाणपत्र, २३९ विद्यार्थ्यांना पीएच.डी., १४ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी पदविका प्रमाणपत्र तर ३ विद्यार्थ्यांना एम.फिलचे प्रमाणपत्र मिळणार आहे. या कार्यक्रमात विविध विद्याशाखांमधील गुणवंत ७१ विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते ११७ सुवर्णपदके प्रदान करण्यात येणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.