Sanjay Raut On Shrikant Eknath Shinde | “आमच्या बेट्याचं काय करायचं ते पाहू, तुमचा लाडला बेटा वर्षा बंगल्यावर बसून…”

0

पुणे : Sanjay Raut On Shrikant Eknath Shinde | अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (CM Ladli Behna Yojana) या योजनेची घोषणा केली आहे. राज्यातील महिला सक्षमीकरणासाठी तसेच महिला आणि मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अबलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची ही महत्त्वपूर्ण योजना आहे. दरम्यान या योजनेच्या घोषणेवरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सरकारवर निशाणा साधला होता. ‘लाडका भाऊ योजना का राबवत नाही’ असे उद्धव ठाकरेंनी म्हंटले होते. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्त्युत्तर दिले होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “आम्ही लाडका भाऊ योजना केली आहे. १० हजार रुपये देत आहोत. पण त्यांनी अडीच वर्षे लाडका बेटा योजना राबवली, त्याचे काय, असा खोचक सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या. राज्यातील सर्व मुलींचे शिक्षण मोफत करण्यात येत आहे. अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडलेला आहे. अजितदादा वाद्याला पक्के आहेत. त्यामुळे हे सरकार दिलेला शब्द पाळणारे आहेत. आतापर्यंत जे जे बोललो, ते ते पूर्ण करून दाखवले आहे “, असे शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले.

यानंतर संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पलटवार केला आहे. राऊत म्हणाले, ” एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या लाडक्या बेट्याविषयी बोलावं. ते सध्या सरकारमध्ये हस्तक्षेप करीत आहे. आम्ही आमच्या बेट्याचं काय करायचं ते पाहू, तुमचा लाडला बेटा वर्षा बंगल्यावर बसून ज्या पद्धतीने पोलीस प्रशासन आणि बिल्डर यांच्याशी मधुर संवाद साधून पुढील निवडणुकीसाठी ही बोलणी करीत आहे.त्याविषयी बोलावं असा टोला राऊतांनी शिंदे यांना लगावला आहे.

पुणे दौऱ्यावेळी राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी निवडणुकीला सामोरे जाताना मुख्यमंत्री पदाचा चेहरा असला पाहिजे याचा पुन्हा एकदा उल्लेख केला. कोणतीही निवडणूक बिनचेहऱ्याची असू नये असे राऊत यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.