Rohit Sharma | कसा होता T20 ! T20 World Cup च्या अंतिम फेरीत Rohit Sharma चा रेकॉर्ड? 140 च्या स्ट्राइक रेटने बनवल्या धावा

0

नवी दिल्ली : Rohit Sharma | भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने २०२४ टी २० विश्वचषकात कर्णधार आणि फलंदाज म्हणून कोणतीही चूक केली नाही. रोहित शर्मा कर्णधार म्हणून आपले पहिले आयसीसी विजेतेपद मिळण्यापासून केवळ एका विजयाच्या अंतरावर आहे.

रोहित सह सध्याच्या भारतीय संघाला मोठ्या सामन्यांचा दबाव चांगला माहित आहे. अलिकडच्या काही दिवसात ते लागोपाठ तिसऱ्यांदा आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचले आहेत. भारत WTC आणि ODI ची फायनल खेळला आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंडवरील शानदार विजयानंतर भारत २००७ आणि २०१४ नंतर तिसऱ्यांदा टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.

दोन टी२० विश्वचषक खेळलाय रोहित शर्मा

रोहित शर्मा यापूर्वी टी२० विश्वचषकात पोहोचलेल्या भारतीय संघात सहभागी होता. रोहितने टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीच्या दोन सामन्यांमध्ये १४० च्या स्ट्राइकने एकुण ५९ धावा केल्या आहेत. रोहितने २००७ च्या अंतिम फेरीत पाकिस्तानविरूद्ध एक महत्वाचा डाव खेळला होता.

या रोमांचक सामन्यात रोहित शर्माने शेवटच्या षटकांमध्ये छोटा डाव खेळत १६ चेंडूंवर ३० धावांचा डाव खेळला होता. या डावामुळे भारत १५७ पर्यंत मजल मारू शकला होता आणि पाकिस्तान हरवत चॅम्पियन बनला होता.

तर, २०१४ टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत रोहित शर्माने श्रीलंका विरूद्ध २६ चेंडूंवर २९ धावांची खेळी केली होती. ढाकात खेळलेल्या या सामन्यात भारत १३० धावसंख्या बनवू शकला होता आणि ६ विकेटने सामना गमावला होता.

सध्याच्या टी२० विश्वचषकात रोहित शर्मा भारताकडून सर्वात जास्त धावा बनवणारा फलंदाज आहे. रोहितने अजूनपर्यंत ७ सामन्यात १५५.९७ च्या स्ट्राइक रेटने २४८ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरूद्ध मॅच विनिंग डाव खेळले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.