Pune RTO Whatsapp Helpline | प्रवाशांनो आता व्हॉट्सॲप वर करा तक्रार ! बेशिस्त रिक्षा, कॅब, खासगी बसवर तातडीने होणार कारवाई

0

पुणे : Pune RTO Whatsapp Helpline | शहरात रिक्षाचालक भाडे नाकारत असल्याच्या तक्रारी प्रवासी नेहमी करतात. याचबरोबर अनेक रिक्षाचालक जवळच्या अंतराचे भाडे नाकारतात अथवा त्यासाठी भाड्यापेक्षा जास्त पैसे मागतात. अनेकजण मीटरने जाण्याऐवजी अव्वाच्या सव्वा रक्कम सांगून प्रवाशांची लूट करतात. याचबरोबर कॅबचालक आणि खासगी बसचालकांबद्दलही प्रवाशांच्या अशाच प्रकारच्या तक्रारी आहेत. मागील काही दिवसांपासून या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे.

आता आरटीओने प्रवाशांना सहजपणे तक्रार करता यावी यासाठी व्हॉट्सॲप हेल्पलाईन क्रमांक 8275330101 सुरु केलेला आहे. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांची तक्रार या क्रमांकावर केल्यांनतर आरटीओ चे अधिकारी या तक्रारीची शहानिशा करतील. ही शहानिशा झाल्यांनतर तातडीने दोषी आढळणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जाईल. या व्हॉट्सॲप हेल्पलाइनमुळे नियमभंग करणाऱ्यांवरील कारवाईची प्रक्रिया जलद होणार आहे.

रिक्षा, कॅब अथवा खासगी बसने भाडे नाकारले, जादा भाडे घेतले, अशा प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण आता जलद होणार आहे. प्रवाशांच्या तक्रारी वाढू लागल्याने प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) यासाठी पाऊल उचलले आहे. प्रवासी आता व्हॉट्सॲप हेल्पलाइन क्रमांकावर थेट तक्रार नोंदवू शकतील. त्यावर आरटीओकडून तातडीने कारवाई केली जाणार आहे.

भाडे नाकारणे अथवा ज्यादा भाडे आकारणी अशा तक्रारी प्रवासी करतात. प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण जलद गतीने करण्यासाठी व्हॉट्सॲप हेल्पलाईन क्रमांक सुरु करण्यात आला आहे अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.