Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी: दस्त नोंदवून देखभाल व ताबा अधिकार दुसऱ्याला देऊन फसवणूक, दोघांवर गुन्हा दाखल

0

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | जमिनीची देखभाल, ताबा व इतर महत्त्वाचे अधिकार कुलमुख्यारपत्राद्वारे दिले असताना परस्पर दुसऱ्या उपनिबंधक कार्यालयात कुलमुखत्यारपत्र तयार करुन ते अधिकार दुसऱ्या व्यक्तीला देऊन फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा 19 डिसेंबर 2023 ते 28 जून 2024 या कालावधीत हवेली क्रमांक 5 चिंचवड व हवेली क्रमांक 18 पिंपरी येथे घडला आहे.

याबाबत संजय चंदनमल जैन (वय-57 रा. स्वप्नकुंज, सिल्वहर गार्डन सोसायटी, पवनानगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात (Chinchwad Police Station) फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार गणेश दगडु पाटील, शर्मिला गणेश पाटील (दोघे रा. वाकड) यांच्यावर आयपीसी 406, 420, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय जैन यांचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. गणेश पाटील यांनी फिर्यादी यांना चिंचवड येथील दुय्यम निबंध हवेली क्र.5 येथील कुलमुखत्यारपत्राच्या आधारे मुळशी तालुक्यातील भेगडेवाडी येथील जमिनीचे 29 नोव्हेंबर 2023 रोजी देखभाल, ताबा व इतर महत्त्वाचे अधिकार दिले होते. त्याच जागेचे 19 डिसेंबर 2023 रोजी पुन्हा हवेली क्रमांक 18, पिंपरी या उपनिबंधक कार्य़ालयात नव्याने कुलमुखत्यारपत्र नोंदवले. फिर्यादी यांना दिलेले अधिकार संदीप कस्पटे व शर्मिला पाटील यांना देण्यात आले. आरोपींनी फसवणूक करण्याच्या उद्देशाने बेकायदेशिररित्या कुलमुखत्यारपत्र दस्त करुन फसवणूक केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.