Pune ACB Action On Retired Deputy Director of Land Records | बेहिशोबी मालमत्ता जमविल्या प्रकरणी भुमी अभिलेखच्या उपसंचालकासह पत्नीवर पुण्यात FIR

0

पुणे : Pune ACB Action On Retired Deputy Director of Land Records | अपसंपदा जमविल्या (Intangible Assets) प्रकरणी नागपूर भुमी अभिलेखच्या तत्कालीन उपसंचालकांसह त्यांच्या पत्नीवर येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून शनिवारी (दि.29) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर भुमी अभिलेखचे सेवानिवृत्त उपसंचालक दादाभाऊ सोनू तळपे Dadabhau Sonu Talpe (वय-62) त्यांच्यासह पत्नी कल्पना दादाभाऊ तळपे Kalpana Dadabhau Talpe (वय-58 दोघे रा. हरमस हेरिटेज, येरवडा, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुणे एसीबीचे पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर यांनी फिर्याद दिली आहे.

आरोपी दादाभाऊ तळपे यांनी संपादित केलेल्या मालमत्तेबाबत पुणे एसीबी कार्यालयाकडून उघड चौकशी करण्यात आली होती. तळपे यांनी संपादित केलेल्या मालमत्ता कायदेशी स्त्रोताद्वारे संपादित केल्या आहेत किवा कसे? याबाबत त्यांना वेळोवेळी संधी देवून माहिती देण्यास सांगितले होते. मात्र, तळपे यांनी संपादित केलेल्या मालमत्तेबाबत पुष्टीदायक पुरावे सादर करु शकले नाहीत. त्यांनी भुमी अभिलेख विभागात कार्यरत असताना आपल्या कार्यकाळात कायदेशीर उत्पन्नापेक्षा स्वत:च्या व पत्नीच्या नावे 28 लाख 52 हजार 541 (ज्ञात उत्पन्ना पेक्षा 18.74 टक्के) किमतची अपसंपदा भ्रष्ट मार्गाने संपादीत केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.

बेहिशोबी मालमत्ता संपादित करण्यासाठी दादाभाऊ तळपे यांना त्यांची पत्नी कल्पना तळपे यांनी सहाय्य केले. तसेच गुन्हा करण्यास प्रोत्साहित केले. त्यामुळे पुणे एसीबीने दोघांवर येरवडा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 13(1)(इ), 13(2) सह भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, आयपीसी 109 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पुणे एसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.