National Pension System (NPS) | NPS मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चांगली बातमी, ज्या दिवशी लावाल पैसे त्याच दिवसापासून NVA चा मिळेल लाभ

0

नवी दिल्ली : National Pension System (NPS) | पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) ने राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) च्या ग्राहकांसाठी निपटारा प्रक्रियेत एक महत्वाच्या बदलाची घोषणा केली आहे. पीएफआरडीएने आता एनपीएस सबस्क्रायबर्सला सेम डे सेटलमेंट (T+0 सेटलमेंट) ची सुविधा दिली आहे. यामुळे जर सबस्क्रायबरने कोणत्याही सेटलमेंट डे ला सकाळी ११ वाजेपर्यंत आपले अंशदान केले तर त्याच दिवशी इन्व्हेस्ट होईल आणि त्याच दिवशीच्या नेट असेट व्हॅल्‍यू (NAV) चा लाभ मिळेल. नवीन व्‍यवस्‍था १ जुलैपासून लागू होईल.

आतापर्यंत ट्रस्टी बँकेद्वारे प्राप्त योगदान दुसऱ्या दिवशी (टी + १) गुंतवले जात होते. म्हणजे आज मिळालेल्या अंशदानाची गुंतवणूक उद्या केली जाते. पीएफआरडीए पॉईंट ऑफ प्रेझेन्स (पीओपी) ने नोडल कार्यालये आणि ईएनपीएससाठी एनपीएस ट्रस्टला सल्ला दिला आहे की, त्यांनी ग्राहकांना ताबडतोब लाभ देण्यासाठी या नवीन कालमर्यादांचे पालन करावे.

पीएफआरडीएच्या या पावलामुळे एनपीएसला म्‍युच्युअल फंडाच्या बरोबरीकडे घेऊन जाणार आहे. यामुळे एनपीएस अकाऊंट होल्‍डरला त्याच दिवशीच्या एनव्हीएचा लाभ मिळेल, जो त्याचे पैसे वाढण्यास सहायक ठरेल. म्‍युच्युअल फंडात तीन वाजेपर्यंत करण्यात आलेल्या गुंतवणुकीवर त्याच दिवसाच्या एनव्हीएचा लाभ मिळतो. ज्या दिवशी बाजार कोसळतो, त्या दिवशी सामान्यपणे लोक जास्त युनिटसाठी गुंतवणुक करतात. एनपीएसमध्ये सुद्धा सेम डे सेटलमेंट लागू झाल्याने हा गुंतवणूक पर्याय सुद्धा आकर्षक होईल. पीएफआरडीएच्या या बदलामुळे ट्रस्टी बँक सकाळी ११ वाजेपर्यंत प्राप्त एनपीएय योगदान त्याच दिवशी इन्व्हेस्ट करेल.

सरकारने कर्मचारी पेन्शन योजना, १९९५ च्या विदड्रॉल नियमात बदल केला आहे. या दुरूस्तीनंतर सहा महिन्यापेक्षा कमी अंशदायी सेवा असलेल्या कर्मचारी पेन्शन योजनेचे सदस्य सुद्धा ईपीएस खात्यातून पैसे काढू शकतील. देशात लाखो असे ईपीएस ९५ योजनेचे सदस्य आहेत जे पेन्शन मिळवण्यासाठी १० वर्षापर्यंत सतत योजनेत योगदान करण्याचा नियम असतानाही मधूनच योजनेतून बाहेर पडतात.

अजूनपर्यंत ६ महिने अथवा त्यापेक्षा जास्त काळापर्यंत योगदान करणारे सभासदच या विदड्रॅल बेनेफिटचा लाभ घेऊ शकता होते. अशावेळी जे सदस्य सहा महिन्यापेक्षा कमी काळापर्यंत योगदान केल्यानंतर योजना सोडतात, त्यांना कोणताही विदड्रॅल बेनेफिट मिळत नव्हता.

Leave A Reply

Your email address will not be published.