Eknath Shinde In Alandi | प्रस्थान सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आळंदीत उपस्थित राहणार

0

आळंदी : Eknath Shinde In Alandi | आषाढी वारी पालखी प्रस्थान निमित्त संत ज्ञानेश्वर माउलींच्या समाधी दर्शन आणि इंद्रायणी नदीच्या पाहणी दौऱ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी तीन वाजता उपस्थित राहणार आहे. शिंदे यांचा दुपारी दोन तासांचा दौरा आळंदीत आहे. यापूर्वी आघाडी सरकार असताना राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत आर आर पाटील यांनी गृहखाते असताना आणि अजित पवार उपमुख्यमंत्री असताना प्रस्थान सोहळ्याच्या दिवशी मंदिरात दर्शनासाठी आले होते. (Pandharpur Ashadhi Wari)

मात्र मुख्यमंत्री आळंदीत प्रस्थान सोहळ्यासाठी येण्याची ही पहिलीच वेळ आहे. मागच्या काही दिवसांपासून इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाबाबत वारकऱ्यांमध्ये चर्चा आहेत. दरम्यान शिंदे यांनी याबाबत दखल घेत आज इंद्रायणी नदीचा पाहणी दौरा आयोजित केला आहे. याआधी मुख्यमंत्री शिंदे तीन वाजता माउलींच्या मंदिरात समाधी दर्शनासाठी येतील. त्यानंतर पालखी प्रस्थान सोहळा पाहतील.

त्यानंतर वारकऱ्यांशी हितगुज केल्यांनतर इंद्रायणी नदीची पाहणी करतील. यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पथकही उपस्थित नसेल. काल जाहीर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात वारकऱ्यांच्या दिंडीसाठी प्रत्येकी २० हजार रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे. त्यामुळे शिंदेंचा हा दौरा महत्वाचा समजला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.