CM Eknath Shinde On Pune Drugs Case | ‘…तोपर्यंत बुलडोझर कारवाई सुरुच राहणार’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा

0

मुंबई : CM Eknath Shinde On Pune Drugs Case | पुणे शहरात मागिल काही दिवसांपासून ड्रग्जची प्रकरणे उघडकीस येत आहेत. काही दिवसांपूर्वीच एफसी रोडवरील (FC Road Pune) पबमध्ये (L3 Bar Pune) अमली पदार्थ सेवन करणाऱ्या तरुणांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. पुणे शहरातील ड्रग्जच्या प्रकरणावरुन आता राज्य सरकारवर चारीबाजूंनी टीका होत आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे. राज्यातील अनधिकृत पबवर कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. राज्यात जिथे कुठे ड्रग्ज विक्री होत असेल तर त्यांना सोडलं जाणार नाही. जोपर्यंत ड्रग्ज मुक्त शहर होत नाहीत, तोपर्यंत बुलडोझर कारवाई सुरु राहणार आहे, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

पुण्यातील ड्रग्ज प्रकरणासंदर्भात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, ड्रग्ज विकणाऱ्यांवर, ड्रग्ज बनवणाऱ्यांवर तसेच ज्या हॉटेलमध्ये ड्रग्ज विक्री केली जाते आणि या माध्यमातून तरुण पिढी बरबाद करण्याचं काम जे लोक करत आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. फक्त पुणे शहरातच नाही तर पुणे, ठाणे, नाशिक आणि संपूर्ण राज्यात जिथे कुठे ड्रग्ज विक्री होत असेल त्यांना सोडलं जाणार नाही. ड्रग्जची पाळंमुळं उखडून फेकण्याचं काम पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त करत आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले, ड्रग्जचे जे सप्लायर असतील आणि कोणी कितीही मोठं असलं तरी त्याला सोडलं जाणार नाही. तरुण पिढी बरबाद होऊ देणार नाही. जोपर्यंत पूर्णपणे ड्रग्ज मुक्त शहरं होत नाहीत तोपर्यंत ही बुलडोझर कारवाई चालू राहिल. जे कोणी ड्रग्ज विकत असतील त्यांच्यावर अशा प्रकारची कारवाई केली जाईल. तसेच या प्रकरणात जे गुन्हेगार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.

इंद्रायणी नदीची पाहणी करणार

आळंदीमध्ये पुन्हा एकदा इंद्रायणी नदीची अवस्था बिकट झाल्याचे निदर्शनात आले. नदीमध्ये रसायनयुक्त पाण्यामुळे इंद्रायणी नदी प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मी स्वत: वारीसाठी जाणार आहे. त्यावेळी मी नदीची पाहणी करणार आहे. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या जातील. इंद्रायणी नदी पूर्णपणे प्रदूषण मुक्त करण्याची भूमिका सरकारची आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.