BSNL Recharge Plans | महागाईच्या काळात आता BSNL चा आधार, सर्व कंपन्यांनी महाग केले प्लान, बीएसएनल अजूनही स्वस्त, 200 रुपयांपर्यंत बचत

0

नवी दिल्ली : BSNL Recharge Plans | देशातील ३ दिग्गज टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ, भारती एयरटेल आणि वोडाफोन-आयडियाने आपले मोबाईल रिचार्ज पॅक महाग केले आहेत. अशावेळी आता चौथा पर्याय म्हणून ग्राहकांकडे BSNL (भारत संचार निगम लिमिटेड) चा पर्याय उरला आहे. .

रिलायन्स जिओच्या प्लानच्या नवीन किमती

  • ७५ जीबी पोस्टपेड डेटा प्लान ३९९ रुपयांनी वाढून ४४९ रुपये.
  • ८४ दिवसांचा लोकप्रिय ६६६ रुपयांचा अनलिमिटेड प्लान वाढून आता ७९९ रुपये.
  • अ‍ॅनुअल रिचार्ज प्लान १,५५९ रुपयावरून १,८९९ रुपये आणि २,९९९ रुपयावरून ३,५९९ रुपये.

एयरटेलच्या प्लानच्या नवीन किमती

  • एयरटेलचे नवीन प्लॅन दर ३ जुलैपासून वाढणार आहेत.
  • एयरटेलचा ८४ दिवसाच्या ७१९ रुपयांचा प्लान वाढून ८५९ रुपये.
  • २ जीबी डाटा प्रतिदिवस आणि ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा रिचार्ज प्लान ८३९ रुपयांवरून ९७९ रुपये.
  • वोडा-आयडियाच्या प्लानच्या नवीन किमती
  • वोडाफोन आयडियाचे नवीन प्लान दर ४ जुलेपासून लागू होतील.
  • २८ दिवसांचा प्लान १७९ रुपयांनी वाढून १९९ रुपये.
  • वोडा-आयडियाचा ४५९ रुपयांचा प्लान आता ५०९ रुपये.
  • यात ८४ दिवसांची व्हॅलिडिटी, तसेच ६जीबी डेटा मिळतो.

बीएसएनएलचे प्लान अजूनही स्वस्त!

बीएसएनएलने अद्याप आपल्या प्लानचे दर वाढवलेले नाहीत.
८४ दिवसांचा, ३ जीबी डाटा प्रतिदिनचा प्लान ५९९ रुपये आहे.
८४ दिवसांच्या व्हॅलिडिटी प्लानवर समारे २०० रुपयांपर्यत बचत होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.