Affordable Insurance Policy | वार्षिक 555 रुपयांचा प्रीमियम भरून मिळवा 10 लाखांचा विमा, या विशेष पॉलिसीची जाणून घ्या पूर्ण माहिती

0

नवी दिल्ली : Affordable Insurance Policy | इंडिया पोस्ट पेमेन्ट्स बँकेने (IPPB) परवडणाऱ्या प्रीमियमवर दोन पर्सनल अ‍ॅक्सीडेंट कव्हर लाँच केले आहेत. हेल्थ प्लस आणि एक्सप्रेस हेल्थ प्लस नावाच्या या पॉलिसीचा कालावधी एक वर्षाचा आहे. या पॉलिसी अपघाती मृत्यू, अपंगत्व आणि वैद्यकीय खर्चासारख्या आर्थिक जोखमींपासून सुरक्षा प्रदान करतात.

हेल्थ प्लसची विमा रक्कम ५ लाख रुपये आहे. मृत्यु अथवा कायमस्वरूपी आणि व्यक्तिगत अपंगत्वावर विमित व्यक्तीच्या कुटुंबाला विमा रक्कमेच्या १००% मिळेल. मुलांच्या विवाहासाठी ५०,००० रुपयांपर्यंत दिले जातील.

हेल्‍थ प्‍लस विमा पॉलिसीमध्ये पॉलिसी होल्‍डरचे अपघातात हाड मोडल्यास २५,००० रुपयांची विमा रक्कम मिळेल. हेल्थ प्लसचा वार्षिक प्रीमियम टॅक्ससह ३५५ रुपये आहे.

एक्सप्रेस हेल्थ प्लस विमा पॉलिसी घेतल्यास व्यक्तीला १० लाख रुपयांची विमा रक्कम मिळेल. दुर्दैवाने मृत्यू अथवा वैयक्तिक अपंगत्वाच्या स्थितीत विमाधारकाच्या कुटुंबाला विमा रक्कमेच्या १००% मिळेल.

जर पॉलिसी होल्‍डर अपघातात जखमी झाला तर त्यास २५,००० रुपयांची विमा रक्कम उपचारासाठी मिळेल. बेशुद्ध पडण्याच्या स्थितीत तीन महिन्यापासून १० आठवड्यापर्यंत प्रति आठवडा १ टक्के दराने विमा रक्कम मिळेल.

याशिवाय एक्‍सप्रेस हेल्‍थ प्‍लस पॉलिसीमध्ये विमाधारकाला अपघात झाल्यास १ लाख रुपयांपर्यंत अपघातील वैद्यकीय उपचार प्रतिपूर्ती ओपीडी खर्चाशिवाय सुद्धा मिळेल.

एक्‍सप्रेस हेल्‍थ प्‍लस पॉलिसी होल्‍डरचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला अंत्यसंस्काराच्या खर्चासाठी जवळपास ५,००० रुपयांचा क्लेम मिळू शकतो. मुलांच्या शिक्षणासाठी ५०,००० रुपयांपर्यंत पैसे मिळतील. एक्‍सप्रेस हेल्‍थ प्‍लस पॉलिसीचा वार्षिक प्रीमियम टॅक्ससह ५५५ रुपये आहे. म्हणजे तुम्हाला केवळ ४६.२५ रुपये महिना प्रीमियमवर हे सर्व लाभ मिळू शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.