Vidhan Parishad Election Maharashtra | विधानपरिषद निवडणुकीत मोठा ट्वीस्ट; मविआतून ठाकरे गट वेगळी वाट धरणार?

0

मुंबई : Vidhan Parishad Election Maharashtra | विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या ११ जागांवर निवडणूक होवू नये यासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र असे असताना शिवसेना ठाकरे गटाने (Shivsena UBT) अतिरिक्त उमेदवार देण्याचे निश्चित केले आहे. महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) मित्रपक्ष असलेल्या जयंत पाटील (Jayant Patil) यांना उमेदवारी द्यावी अशी योजना होती. त्याला शरद पवार गटाने (Sharad Pawar NCP) पाठिंबा ही दिला आहे.

मात्र शिवसेनेने त्याला नकार दिला असल्याने जयंत पाटील यांचे गणित बिघडण्याची शक्यता आहे. शिवाय जर अतिरिक्त उमेदवार रिंगणात असेल तर निवडणूक होणार हे निश्चित आहे. त्यात ठाकरे यांनी सत्तापक्षातील काही नेते संपर्कात असल्याचे सांगत तिसरा उमेदवार निवडून आणू असेही सांगितले होते.

महाविकास आघाडीचे दोन उमेदवार विधान परिषदेत सहज विजयी होवू शकतात एवढे संख्याबळ त्यांच्याकडे आहे. तर काँग्रेसचे संख्याबळ बघता त्यांचा एक उमेदवार विजयी होईल. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट मिळून एक उमेदवार विधान परिषदेत जावू शकतो. पण शेकापच्या जयंत पाटील यांना पाठिंबा देण्यास शिवसेना ठाकरे गटाने नकार दिला आहे.

तिसरा उमेदवार आपण मैदानात उतरवणार असल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले आहे. उद्धव ठाकरे यांनीच याबाबत स्पष्ट केले आहे. आमच्याकडे आकडे आहेत यात आम्ही गणित जळवून आणू त्यामुळे आमचे तीन उमेदवार निवडून येतील असे ठाकरे म्हणाले होते. शिवसेना आपला उमेदवार रिंगणात उतरवेल असेही ते म्हणाले.

शिवाय रायगड आणि मावळ लोकसभेत शेकापने मदत न केल्याचा आरोप शिवसेनेचा आहे. त्यामुळे त्यांना मदत करू नये अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. शिवाय अनंत गिते यांनीही शेकापला विरोध दर्शवला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.