Uttam Nagar Pune Crime News | पुणे: मिलेट्री कॅम्प परिसरातील शिवमंदीरात चोरी, तीन चोरट्यांना अटक

0

पुणे : Uttam Nagar Pune Crime News | एन.डी.ए खडकवासला मिलेट्री कॅम्प (NDA Khadakwasla Military Camp) येथील शिवमंदिरात चोरी करणाऱ्या तिघांना उत्तमनगर पोलिसांनी (Uttam Nagar Police) अटक केली आहे. ही घटना बुधवारी (दि.26) सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास घडली होती. चोरट्यांनी मंदिरातील तांब्याचा कलश व पितळी नाग चोरून नेला होता. याबाबत भास्कर दिनेशचंद सुयाल (वय-27 रा. सरस्वती नगर, शिंदे पार्क जवळ, उत्तमनगर) यांनी गुरुवारी (दि.27) उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

प्रदीप रामेश्वर मगर (वय-19 रा. नांदेड सिटी, नांदेड फाटा, पुणे), राहुलकुमार देवीदीन यादव (वय-27 रा. साईकृपा सोसायटी, जाधवनगर, धायरी, पुणे), स्वप्नील मारुती चव्हाण (वय-21 रा. जि.प. शाळेजवळ, नांदेड गाव, पुणे) यांच्यावर आयपीसी 379, 34 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एनडीए खडकवासला मिलेट्री कॅम्प येथे शिवमंदिर असून बुधवारी सायंकाळी आरोपी मंदिरात आले. त्यांनी मंदिरातील तांब्याचा कलश व पीतळी नाग असा एकूण अडीच हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. फिर्यादी मंदिरात गेल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ उत्तमनगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करुन गुन्हा उघडकीस आणला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

घरकाम करणाऱ्या महिलेने चोरले दागिने

कोंढवा : घरकाम करणाऱ्या महिलेने घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार कोंढवा येथील साळुंखे विहार सोसायटीतील फ्लॅट नंबर 8 मध्ये घडला आहे. याप्रकरणी शितल अनिल क्षिरसागर (रा. स्वामी समर्थ नगर, पुणे) हिच्यावर आयपीसी 381 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 76 वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्य़ाद दिली आहे. आरोपी शितल क्षिरसागर हिने फिर्यादी यांच्या घरात काम करत असताना बेडरुममधील लाकडी कपाटातील 60 हजार रुपये किमतीची 20 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन चोरून पसार झाली. पोलीस आरोपी महिलेचा शोध घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.