Uddhav Thackeray On Mahayuti | मुख्यमंत्रीपदाबाबत आता उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य; महायुतीची कोंडी

0

मुंबई : Uddhav Thackeray On Mahayuti | आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार? याबाबत चर्चा सुरु आहेत. नुकतेच उद्धव ठाकरेंचे नाव मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करावे अशी मागणी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली होती. त्यानंतर त्याचे पडसाद मविआमध्ये उमटले. याबाबत उद्धव ठाकरे यांना प्रश्न केल्यानंतर त्यांनी थेट उत्तर देणे टाळले.

मात्र त्यांनी महायुतीची कोंडी केली आहे. लोकसभेला जे अपयश पदरी पडले त्या अपयशाचा धनी कोण, ते आधी सांगा असा प्रतिप्रश्न महायुतीच्या नेत्यांना केला आहे. त्यांनी हे नाव जाहीर केल्यानंतर मग आम्ही आमचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण हे सांगू असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवाय महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा योग्य वेळी जाहीर केला जाईल असेही ठाकरे यांनी सांगितले.

हे अधिवेशन सरकारच्या निरोपाचे अधिवेशन असल्याचे त्यांनी सांगितले. या सरकारला सर्वचजण बायबाय करीत आहेत. त्यामुळे या सरकारकडून लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जो अर्थसंकल्प सादर केला जाईल तो गाजर संकल्प असेल अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांच्या वाढत असलेल्या आत्महत्येवरूनही सरकारवर निशाणा साधला.

निवडणुकीसाठी आमची रणनिती तयार आहे. गणितही पक्कं आहे. शिवाय मतं कशी सांभाळायची याची काळजी महायुतीने घ्यावी. निवडणुकीनंतर कोण कोणाला गुप्त पद्धतीने पेढे भरवतोय हे समजेल असे वक्तव्य करत महायुतीमध्ये ठाकरेंनी खळबळ उडवून दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.