Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी: कोयत्याने वाहनांची तोडफोड करुन लुटमार करणारा गजाआड

0

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | मोशी परीसरामध्ये (Moshi) गाडयांची तोडफोड करून लुटमार करणाऱ्या आरोपीला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी (MIDC Bhosari Police Station) अटक केली आहे. आरोपीने एका टेम्पो चालकाला कोयत्याचा धाक दाखवून खिशातील पाचशे रुपये जबरदस्तीने काढून घेत चार वाहनांची तोडफोड करुन परिसरात दहशत पसरवली. हा प्रकार बुधवारी (दि.26) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास लक्ष्मीनगर परिसरातील इंग्लिश स्कुल समोर घडला.

याबाबत टेम्पो चालक गणेश बालाजी घोकणे (वय-31 रा. राजे संभाजी कॉलनी, लक्ष्मीनगर मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन सुनील मोहन जाधव (वय-23 रा. दक्षिण लक्ष्मीनगर, मोशी) याच्यावर आयपीसी 392, 323, 504, 427, आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे टेम्पो चालक आहेत. बुधवारी रात्री आरोपीने हातातील लोखंडी कोयत्याचा धाक दाखवून फिर्य़ादी यांना शिवीगाळ केली. तसेच हाताने मारहाण करुन त्यांच्या शर्टच्या खिशामधून जबरदस्तीने पाचशे रुपये काढून घेतले. त्यानंतर फिर्य़ादी यांचा महिंद्रा कंपनीचा जितो टेम्पोच्या समोरील काचेवर कोयता मारुन काच फोडली. तसेच त्याठिकाणी असलेल्या इतर तीन टेम्पोच्या काचा फोडून नुकसान करुन परिसरात दहशत पसरवली. याबाबत गणेश घोकणे यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी निष्पन्न करुन त्याला अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस.बी. इंगळे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.