Pune News | गौण खनिज विभागाच्या भरारी पथकाच्या मनमानी कारभारा विरोधात जिल्ह्यातील खाण आणि क्रशर व्यावसायीकांचा चार दिवसांपासून संप

0

क्रश सँड आणि खडीच्या टंचाईमुळे महापालिकेच्या प्रकल्पांना फटका

पुणे : Pune News | जिल्हा प्रशासनाच्या गौण खनिज विभागाच्या भरारी पथकाच्या मनमानी कारभार आणि व्यावसायिकांच्या विविध मागण्यासाठी जिल्हा खाण व क्रशर उद्योजक संघाने सुरू केलेल्या संपाचा फटका महापालिकेच्या विविध प्रकल्पांना बसत आहे. विकास प्रकल्पांसाठी लागणारी सँड क्रश, खडीसारखे आवश्यक मटेरिअल मिळत नसल्याने महापालिकेची कामे थंडावली आहेत. या मटेरिअलचा स्टॉकही संपत आल्याने हा संप न मिटल्यास प्रकल्पांची कामे बंद ठेवावी लागतील, अशी भिती महापालिकेच्या अधिकार्‍यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

महापालिकेच्या वतीने अनेक प्रकल्पांची कामे सुरू आहेत. तसेच मेट्रो प्रकल्पांची देखिल कामे सुरु आहेत. यामध्ये भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे काम सुरू आहे. येथील कॉंक्रिटीकरणाच्या कामासाठी खडी आणि क्रश सँटचा वापर होतो. याशिवाय शहरातील विविध रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी खडीचा वापर करावा लागतो. मात्र, जिल्हा खाण व क्रशर उद्योजक संघाने भरारी पथकाच्या मनमानी कारभाराविरोधात व खाणपट्टा नूतनीकरणास होणारा विलंब, राज्य स्तरीय पर्यावरण समितीचे प्रलंबीत प्रश्न, खाणपट्टा परवानगी प्रक्रिया सुलभ करावी, यांसह इतर मागण्यांसाठी मागील काही दिवसांपासून संप पुकारला आहे. त्यामुळे खडी क्रशर बंद आहेत. या संपाचा फटका महापालिकेच्या प्रकल्पांना बसत आहे. आणखी काही दिवस संप न मिटल्याने कामे बंद ठेवावी लागणार आहेत.

   खडीसाठी काम बंद ठेवण्याची वेळ येऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयास पत्र देवून संप मिटवण्यासाठी योग्य ते प्रयत्न करावेत, अशी मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.