Praful Patel | ‘ते’ काम प्रफुल्ल पटेलांच्या काळातील; केंद्रीयमंत्री मोहोळांकडून चौकशीचे आदेश

0

दिल्ली : Praful Patel | दिल्लीत झालेल्या मुसळधार पावसाने विमानतळाच्या टर्मिनल एक वरील छताचा काही भाग कोसळून अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून सुमारे आठ जण जखमी झाले आहेत. त्यावरून आता राजकारण तापले असून विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत. (Delhi Airports Terminal 1 Accident)

या इमारतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मागील तीन महिन्यांपूर्वीच उदघाटन झाले असल्याचा दावा विरोधक करत आहेत. मात्र प्रत्यक्षात हे काम २००९ मध्ये युपीए सरकारच्या काळात झाल्याचे खुद्द तत्कालीन केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांनीच सांगितलं आहे. या दुर्घटनेची उच्च स्तरीय चौकशी केली जाणार आहे.

प्रफुल्ल पटेल हे २००९ मध्ये युपीए सरकारमध्ये मंत्री होते. माध्यमांशी बोलताना पटेल म्हणाले, ” देशातील एका मोठ्या कंपनीने माझ्या देखरेखीखाली हे काम केले आहे. हे काम १५ वर्षांपूर्वी झाले होते. त्याचा खूप वापरही झाला त्यामुळे कोणत्याही निकषांपर्यंत येण्याआधीच त्याचे ऑडिट व्हायला पाहिजे. तसेच दुर्घटनेचे कोणी राजकारण करू नये असेही पटेल यांनी सांगितले.

या घटनेची मोहोळ यांनी सकाळी पाहणी केली. त्यांनतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी एक्सवर पोस्ट करत या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश डीजीसीएला दिल्याचे म्हंटले आहे. तसेच इतर विमानतळांवर तपासणी केली जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.