PMC Action On Unauthorized Hotel-Bar-Pubs In Pune | पुणे महापालिकेने सलग तिसर्‍या दिवशी बार आणि हॉटेल्सचे 64000 चौ.फूट बांधकाम पाडले; हडपसर येथील दहा गुंठ्यातील कल्ट बारही केला उद्धवस्त (Video)

0

पुणे : PMC Action On Unauthorized Hotel-Bar-Pubs In Pune | महापालिकेने सलग तिसर्‍या दिवशी बार आणि हॉटेल्सच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरु ठेवली. शुक्रवारी हडपसर येथील कड वस्तीमध्ये असलेल्या प्रसिद्ध कल्ट बारचे (The Cult Clubs Restaurants In Magarpatta) तब्बल दहा हजार चौ.फुटांच्या अनधिकृत बांधकामासह महंमदवाडी, उंड्री येथील हॉटेल्सची सुमारे ६४ हजार चौ.फुटांची अतिक्रमणे काढून टाकली. (The Cult Pub)

 शुक्रवारी महापालिकेच्या बांधकाम विभागाने सकाळपासूनच नोटीसेस दिलेल्या हॉटेल्स, बार आणि अन्य व्यावसायीकांच्या आस्थापनांतील बेकायदा बांधकामांवर कारवाई सुरू केली. यामध्ये प्रामुख्याने हपडसर येथील कड वस्तीमध्ये असलेल्या प्रसिद्ध कल्ट बारचे तब्बल दहा हजार चौ.फुटांचे अनधिकृत शेड पाडून टाकले. यासोबतच महंमदवाडी येथील बार ऍन्ड बेकरी, गार्लीक हॉटेल, हायलॅन्ड बार, माउंटन हाय, हॉटेल तत्व, फ्युजन ढाबा, सन राईज कॅपे, भवानी पेठेतील बांधकाम शेड, फुरसुंगी येथील आरसीसी शेड, रविवार आणि गणेश पेठेतील आरसीसी शेड, वारजे येथील आरसीसी बांधकाम आणि न्यायालयाने स्थगिती उठविल्यानंतर राजाराम पुल ते म्हात्रे पुलादरम्यान ग्रीन बेल्टमधील सुमारे एकवीसशे चौ.फुटांच्या शेडस्चा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.