Dhananjay Munde On Rohit Pawar | “आंतरराष्ट्रीय नेते रोहित पवार कोणत्या पक्षात जाणार हे सांगावं लागेल; धंनजय मुंडेंचा पलटवार

0

मुंबई : Dhananjay Munde On Rohit Pawar | यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाने (Sharad Pawar NCP) मोठे यश मिळवले. निवडणुकीच्या निकालानंतर आमदार रोहित पवार हे अजित पवार गटातील आमदार आमच्या संपर्कात असल्याचे वक्त्यव्य सातत्याने करीत आहेत. त्याला आता मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे.

ते म्हणाले, “आंतरराष्ट्रीय नेते रोहित पवार यांनी रोज उठून एवढे आमदार संपर्कात आहेत हे सांगण्यापेक्षा त्यांची नावे सांगावीत. नाहीतर तुम्ही कोणाकोणाच्या संपर्कात आहेत त्यांची नावे समोर येतील असा टोला मंत्री मुंडे यांनी लगावला आहे. असंख्य अन्याय अजित दादांनी सहन केले, उद्या तुमच्यावर अन्याय झाला तर कोणत्या पक्षात जाणार? हे उद्या आम्हाला माध्यमांसमोर स्पष्ट सांगावं लागेल.

आम्ही गहुंजे स्टेडियमला शरद पवार यांचे नाव द्यावे म्हणून एकत्र असताना निवेदन दिले होते. पण आजपर्यंत त्यांनी नाव दिलेले नाही. यावरून त्यांचं आजोबांवर किती प्रेम आहे हे दिसतं, असंही धनंजय मुंडे म्हणाले. आमच्यासोबत असलेला एकही आमदार त्यांच्यासोबत सोडाच तर अजून कोणाच्या संपर्कात आहेत हे येणाऱ्या काळात कळेल, असेही मुंडे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.