Pune Airtport | पुणेकरांना मोठा दिलासा ! ‘पार्किंग बे’वरील एअर इंडियाचे ‘ते’ विमान हटविले; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांना यश

0

संरक्षण मंत्र्यांच्या भेटीनंतर 24 तासांच्या आत कार्यवाही; विमानांचा विलंब तत्काळ टळणार

पुणे : Pune Airtport | गेल्या दीड महिन्यांपासून पुणे विमानतळाच्या ‘पार्किंग बे’वर उभ्या असणाऱ्या एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाला संरक्षण दलाच्या जागेत हलवण्यात आले आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतल्यानंतर अवघ्या २४ तासात सदरील विमान संरक्षण खात्याच्या जागेत ‘पार्क’ करण्याची परवानगी दिली. या विमानाला हलविल्यामुळे पुणे विमानतळावरील ये-जा करणाऱ्या विमानांचा विलंब टळणार आहे.

पुणे विमानतळाच्या ‘बे’वर एअर इंडियाचे अपघातग्रस्त विमान जागेवर उभे असल्याने त्याचा ताण इतर विमानांच्या प्रवासी वाहतुकीवर झाला होता. शिवाय ही बे वापरात नसल्यामुळे विमानांचे वेळापत्रक कोलमडत होते. सदरील विमान दुरुस्तीसाठी आणखी काही काळ लागण्याची शक्यता असल्याने विमान तात्पुरत्या स्वरुपात संरक्षण दलाच्या जागेवर हलविण्याचा पर्याय उपलब्ध होता. या पार्श्वभूमीवर अपघातग्रस्त विमान संरक्षण दलाच्या जागेत लावण्याबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी केंद्रीय मंत्री मोहोळ यांची चर्चा झाली होती.

केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, ‘अपघातग्रस्त विमान हटवल्याने याचा मोठा दिलासा पुणेकरांना मिळणार असून कोलमडलेले वेळापत्रक पुन्हा जागेवर येईल. १० पैकी १ बे बंद असल्याचा मोठा परिमाण झाला होता. एका दिवसाला एका पार्किंग बेवर ८ ते ९ विमानांची ये-जा होत असते. मात्र बे बंद असल्याने याचा अतिरिक्त ताण इतर ९ बेवर आला होता आणि याचमुळे वेळापत्रक कोलमडले होते.

‘आम्ही अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पार्किंग बेवर पाहणी केल्यानंतर संरक्षण खात्याच्या जागेत सदरील विमान पार्क करण्याचा पर्याय समोर आला. म्हणूनच तातडीने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना पत्र पाठविले आणि भेटही घेतली. भेटीच्या २४ तासाच्या आतच ही कार्यवाही झाल्याने पुणेकर प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. तातडीने निर्णय घेतल्याबद्दल संरक्षण सिंह यांचे पुणेकरांच्या वतीने धन्यवाद मानतो’, असेही मोहोळ म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.