Maharashtra Weather Update | राज्यात पुढील 2 दिवसात अतिमुसळधार पाऊस; आयएमडी कडून धोक्याचा इशारा

0

पुणे : Maharashtra Weather Update | राज्यात पुढील दोन दिवस अनेक भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणात अतिमुसळधार पावसाचा तसेच वादळी वाऱ्याचा देखील इशारा देण्यात आला आहे. पुण्यात आज ढगाळ हवामान राहणार आहे. पुण्यात बुधवारी काही तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. (Maharashtra Rains)

पुण्यात काही तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर घाट विभागात पावसाचा जोर वाढून मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याने या ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (IMD Warns Heavy Rains)

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, आज उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह ताशी ४० ते ५० किमी वेगाने वादळी वारे वाहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विदर्भात अमरावती, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. असे असले तरी विदर्भात पावसाचा जोर अद्याप वाढलेला नाही. येथील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान मुंबईत पुढील चोवीस तासात ढगाळ हवामान राहणार असून काही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. (Pune Rains)

पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.