Lonikand Pune Crime News | पुणे: बोलत नसल्याच्या कारणावरुन महिलेचे अश्लील फोटो केले व्हायरल, तरुणावर गुन्हा दाखल

0

पुणे : – Lonikand Pune Crime News | बोलत नसल्याचा राग मनात धरून एका तरुणाने महिलेसोबत काढलेले दोघांचे अश्लील फोटो व्हायरल करुन विनयभंग केल्याची घटना घडली आहे (Molestation Case). ही घटना मंगळवारी (दि.25) रात्री दहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी 33 वर्षीय तरुणावर आयटी अॅक्ट व विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत 32 वर्षीय महिलेने बुधवारी (दि.26) लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन सागर महादेव काळे Sagar Mahadev Kale (वय-33 रा. पुणे) याच्यावर आयपीसी 354, 506, आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी पूर्वी हडपसर परिसरात एकाच परिसरात राहत होते. त्यामुळे ते एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्यानंतर महिलेने घर बदलून दुसरीकडे राहायला गेली. त्यामुळे त्यांच्या बोलणे होत नव्हते.

महिला बोलत नसल्याचा राग आरोपीच्या मनात होता. त्याने हडपसर परिसरात राहत असताना दोघांचे एकत्रित काढलेले अश्लील फोटो महिलेला व तिच्या पतीच्या व्हॉट्सअॅपवर पाठवून व्हायरल करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याबाबत महिलेने जाब विचारला असता त्याने अजून अश्लील फोटो सर्वांना पाठवून बदनामी करणार असल्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

मारहाण करुन महिलेचा विनयभंग

पुणे : दरात चप्पल स्टँडमध्ये चप्पल ठेवल्याच्या कारणावरुन 47 वर्षीय महिलेसोबत वाद घातला. त्यानंतर महिलेच्या अंगावर हात टाकून असभ्य वर्तन करुन विनयंभंग केला. तसेच अश्लील शिवीगाळ करुन घरा बाहेर ओढून मारहाण केली. हा प्रकार मंगळवारी (दि.25) रात्री साडे आठच्या सुमारास आंबेगाव बुद्रुक (Ambegaon Bk) परिसरात घडला आहे. याप्रकरणी काशीनाथ शिंदे, शैलेश शिंदे आणि एका महिलेवर आयपीसी 451, 354, 504, 506, 509, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.