Ambegaon Bk Pune Crime News | पुणे: एकच फ्लॅट दोन बँकांना तारण ठेवून 42 लाखांची फसवणूक, बँक अधिकाऱ्यासह तिघांवर FIR

0

पुणे : Ambegaon Bk Pune Crime News | फ्लॅट खरेदी करण्याची तयारी दाखवून दोन लाख रुपये देऊन रजिस्टर करारनामा केला. त्यानंतर कर्ज होत नसल्याचे कारण सांगून फ्लॅटची कागदपत्रे दोन बँकांमध्ये तारण ठेवून कर्ज घेऊन एका व्यक्तीची 42 लाख 50 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) फायनान्स, आयसीआयसीआय बँक मॅनेजरसह तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 23 मे 2023 ते 29 डिसेंबर 2024 या कालावधीत आंबेगाव बुद्रुक येथील व्यंकटेश ऑर्चिड येथे घडला आहे.

याबाबत दिनेश लक्ष्मण रासकोंडा (वय-52 रा. शंकर महाराज सोसायटी, बिबवेवाडी) यांनी बुधवारी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार निखिल किसन डांगे Nikhil Kisan Dange (वय-32 रा. फ्लॅट नं. 104, सायली सोसायटी, बाणेर), पिरामल कॅपिटल अँड फायनान्स (Piramal Capital and Housing Finance (PCHFL) बिबवेवाडी शाखा, आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) शाखा भांडारकर रोड यांच्यावर आयपीसी 420, 467, 468, 471, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आंबेगाव येथे 15 गुंठे जागा खरेदी करुन तेथे व्यंकटेश ऑर्चिड नावाने बांधकाम केले आहे. याठिकाणी 31 सदनिकांचे काम पूर्ण झाले असून पहिल्या मजल्यावरील फ्लॅट आरोपी निखिल डांगे याने 44 लाख 50 हजार रुपयांना खरेदी करण्यास तयारी दर्शवली. डांगे याने फिर्यादी यांना दोन लाख रुपये आरटीजीएस द्वारे दिले. तसेच उर्वरित रक्कम रजिस्टर करारनामा झाल्यावर देतो असे सांगितले.

फिर्यादी यांनी करारनामा केल्यानंतर डांगे याने फिर्यादी यांना तुमच्याकडून पहिल्या मजल्या ऐवजी दुसरा मजला झाल्यामुळे लोन होत नसल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांना फ्लॅट नं. 101 च्या दारावर परिमल फायनान्स यांनी लावलेली नोटीस दिसली. फिर्यादी यांनी फायनान्स मध्ये जाऊन चौकशी केली असता आरोपी निखिल डांगे याने फ्लॅटचे कागदपत्र देऊन 35 लाखाचे कर्ज घेतल्याचे समजले.

तसेच याच फ्लॅटचे कागदपत्र आयसीआयसीआय बँकेच्या भंडारकर रोड शाखेत देऊन 37 लाख 82 हजार रुपयांचे कर्ज घेतल्याचे समजले. निखिल डांगे याने पुणे मर्चंट बँकेत साई डेव्हलपर्स या नावाने बनावट खाते उघडून कर्जाची रक्कम त्या खात्यात जमा केली. त्यानंतर स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी पैसे काढून घेतले. कर्ज देताना संबंधित फायनान्स आणि बँक मॅनेजर यांनी कागदपत्रांची कोणतीही शहानिशा न करता कर्ज दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शेंडे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.