Ambegaon Bk Pune Crime News | पुणे : ‘राणीहार’ बनवून देण्याच्या बहाण्याने साडे 17 लाखांची फसवणूक, चार जणांवर गुन्हा दाखल

0

पुणे : – Ambegaon Bk Pune Crime News | दहा तोळे वजनाचे तीन राणीहार चांगल्याप्रकारे तयार करुन देतो असे सांगून महिलेकडून 25 तोळे सोन्याचे दागिने आणि पाच लाख रुपये असा एकूण 17 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) चार जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी तक्रारदार महिलेसह इतर पाच महिलांची अशाच प्रकारे फसवणूक केली आहे.

याबाबत शितल राजेंद्र गायकवाड (रा. डी. मार्ट जवळ, आंबेगाव बु., पुणे) यांनी बुधवारी (दि.26) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाबुराव तुकाराम कांबळे, निर्मला बाबुराव कांबळे (रा. आंबेगाव बु.), अनिल बाबुराव कसबे (वय-33), सुनील बाबुराव कसबे (वय-33 दोघे रा. सनविव सोसायटी, आंबेगाव बु.) यांच्यावर आयपीसी 406, 420, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 2 फेब्रुवारी 2023 ते 26 जून 2024 या कालावधीत आंबेगाव बु. येथील माऊली ज्वेलर्स या दुकानात घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचे आंबेगाव येथे माऊली ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. आरोपींनी फिर्यादी यांना प्रत्येकी 10 तोळे वजनाचे तीन असे एकूण 30 तोळे वजनाचे सोन्याचे राणीहार चांगल्याप्रकारे बनवून देतो असे सांगितले. आरोपींनी फिर्य़ादी यांचा विश्वास संपादन करुन 12 लाख 50 हजार रुपये किमतीचे 25 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने घेतले. तसेच 5 लाख रुपये रोख असा एकूण 17 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज घेतला. पैसे आणि दागिने घेतल्यानंतर आरोपींनी अद्याप पर्य़ंत राणीहार अथवा घेतलेले दागिने व पैसे परत न करता अपहार करुन फसवणूक केली. आरोपींनी फिर्यादी यांच्यासह आंबेगाव परिसरात राहणाऱ्या इतर पाच महिलांची देखील अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.