ACB Trap On Police Havaldar | लाच स्वीकारताना पोलीस कर्मचाऱ्यासह पंटर अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

0

सोलापूर : ACB Trap On Police Havaldar | गुन्हा दाखल असल्याचे सांगून फक्त चॅपटर केस करुन सोडून देण्यासाठी 10 हजार रुपये लाच घेताना पोलीस कर्मचाऱ्यासह खासगी व्यक्तीला सोलापूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि.26) करण्यात आली. दोघांवर जेलरोड पोलीस ठाणे, सोलापूर शहर (Jail Road Police Station Solapur) येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Solapur ACB Trap)

पोलीस हवालदार किरण देविदास म्हेत्रे Kiran Devidas Mhetre (वय-46 रा. नर्मदा बिल्डींग, अरविंदधाम पोलीस वसाहत, सोलापूर), खासगी व्यक्ती रोहित नागेश गवड Rohit Nagesh Gawad (वय-33 रा. दक्षिण कसबा, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) असे लाच घेताना अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. पोलीस हवालदार किरण म्हेत्रे विजापूर नाका पोलीस ठाण्यात (Vijapur Naka Police Station) कार्यरत आहेत. (Solapur Bribe Case)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व त्यांच्या मामे भावाविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात आयपीसी 325 नुसार गुन्हा दाखल असल्याचे पोलीस हवालदार किरण म्हेत्रे याने सांगितले. दाखल गुन्ह्यात तक्रारदार यांना अटक न करता, फक्त चॅप्टर केस करुन सोडून देण्यासाठी म्हेत्रे याने खासगी व्यक्ती रोहित गवड याच्या मार्फत तक्रारदार यांच्याकडे 25 हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी सोलापूर एसीबीकडे याबाबत तक्रार केली.

प्राप्त तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता पोलीस हवालदार किरण म्हेत्रे याने खासगी इसम रोहित गवड याच्यामार्फत 25 हजार रुपयांची लाच मागून तडजोडी अंती 10 हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच लाचेची रक्कम रोहित गवड याच्याकडे देण्यास सांगितले. एसीबीच्या पथकाने सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून 10 हजार रुपये लाच घेताना रोहित गवड याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस हवालदार किरण म्हेत्रे याला ताब्यात घेतले. दोघांवर जेलरोड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही करावाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार, पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस अंमलदार शिरीषकुमार सोनवणे, श्रीराम घुगे, अतुल घाडगे, रवि हाटखिळे, राहुल गायकवाड यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.