Vidhan Parishad Election | विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून मुस्लिम चेहऱ्याला संधी मिळणार?; तीन नावे चर्चेत, कोणाची वर्णी लागणार?

0

मुंबई : Vidhan Parishad Election | यंदा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले. या निवडणुकीत काँग्रेसच्या १७ पैकी १३ जागा निवडून आल्या तर सांगलीत बंडखोरी केलेल्या विशाल पाटलांनी (Vishal Patil) काँग्रेसला पाठिंबा दिला. या १७ जागांपैकी एकाही जागेवर काँग्रेसने (Congress) मुस्लिम उमेदवार दिलेला नव्हता त्यामुळे विधानपरिषदेसाठी आता मुस्लिम चेहऱ्याला संधी दिली जाऊ शकते. (MLC Election In Maharashtra)

राज्यात मुस्लिम जनतेने लोकसभेत काँग्रेसला चांगली साथ दिली. त्याची परतफेड म्ह्णून समाजातील नेत्यांना विधानपरिषदेवर संधी द्यायला हवी अशी मागणी राज्यातील नेत्यांनी पक्ष नेतृत्वाकडे केली होती. या मागणीला हिरवा कंदील मिळाला आहे.

विधान परिषदेच्या एकूण ९ जागा रिक्त होत आहेत. काँग्रेसकडे असलेल्या आमदारांची संख्या पाहता त्यांचा एक उमेदवार विजयी होऊ शकतो. काँग्रेसचे नेते वजाहत मिर्झा (Wajahat Mirza) यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे रिक्त होणाऱ्या जागेवर त्यांची वर्णी लागू शकते. मिर्झा यांच्यासह माजी आमदार मुझफ्फर हुसेन (Muzaffar Hussain) आणि नसीम खान (Naseem Khan) यांची नावं चर्चेत आहेत.

मुझफ्फर हुसेन मीरारोड भाईंदर महापालिकेचे माजी नगरसेवक, उपमहापौर आहेत. २००४ ते २००९ आणि २०१४ ते २०१६ या कालावधीत ते विधानपरिषदेचे सदस्य राहिले आहेत. २०१९ मध्ये त्यांची प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष झाले.

विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी चर्चेत असलेले नसीम खान चांदिवलीचे माजी आमदार आहेत. राज्य मंत्रिमंडळात त्यांनी काम केले आहे. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी ते उत्सुक होते.

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या १२ जुलै रोजी विधानपरिषदेसाठी मतदान आणि मतमोजणी होणार आहे. तर २ जुलै ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. १६ जुलैच्या आधी ही मतदान प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.