RBI Governor Shaktikanta Das | ‘भारताचा आर्थिक विकास 8 टक्के दराने वाढण्याच्या मार्गावर’ – आरबीआय गव्हर्नर

0

मुंबई : RBI Governor Shaktikanta Das | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले की, मी भारताच्या अर्थव्यवस्थेची प्रगती आणि महागाई कमी करण्याबाबत सकारात्मक आहे. भारत दोन्ही आघाड्यांवर चांगले काम करेल. देश योग्य दिशेने पुढे वाटचाल करत आहे. आपला जीडीपी सुद्धा मजबूत स्थितीत आहे. देशाच्या ग्रामीण भागात खप वाढत आहे. आम्हाला सर्व बाबतीत चांगली बातमी मिळत आहे, असे दास म्हणाले. ते मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते.

शक्तिकांत दास यांनी बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (Bombay Chamber of Commerce & Industry) च्या १८८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले, भारत आपल्या विकासाच्या मार्गावर मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. भारताचा जीडीपी सातत्याने ८ टक्के वेगाने पुढे जात आहे. आपण जगाच्या मोठ्या अर्थव्यवस्थेला मागे टाकत सातत्याने विकासाची गती कायम राखली आहे.

आरबीआय गव्हर्नर म्हणाले, सध्या आम्हाला एक मजबूत विकासाची गती दिसत आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये सुद्धा आम्ही ८ टक्केपेक्षा जास्त वेग राखला. मागील आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत सुद्धा आम्ही अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली. आता आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या पहिल्या पहिल्या तिमाहीत सुद्धा ही गती मजबूत आहे. आता आरबीआयचा अंदाज आहे की, एप्रिल-जून तिमाहीत आर्थिक वाढ आमच्या अंदाजापेक्षा थोडी जास्त आहे. यामध्ये ग्रामीण भागात वाढत असलेल्या विक्रीने सकारात्मक परिणाम केला आहे.

शक्तिकांत दास म्हणाले, भारतासारखा मोठा देश एकाच सेक्टरवर अवलंबून राहू शकत नाही. आम्हाला मॅन्युफॅक्चरिंग, सर्विस, एक्सपोर्ट आणि अ‍ॅग्रीकल्चरचा एकाचवेळी विकास करावा लागेल. अ‍ॅग्रीकल्चर सेक्टरमध्ये खुप काम झाले आहे. परंतु, अजूनही खुप काम करणे बाकी आहे.

आम्हाला सप्लाय चेन आणि व्हॅल्यू चेन फ्रेमवर्क मजबूत करावे लागेल. स्वातंत्र्यानंतर सर्वात जास्त सुधारणा जीएसटी आहे. अनेक देशांच्या तुलनेत आपल्या येथे जीएसटी खुपच स्थिर झाले आहे. जीएसटी अंतर्गत दर महिन्याला १.७ ट्रिलियन रुपयांचे कलेक्शन होत आहे. सोबतच व्यापर सोयीयुक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.