Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी: जमीन विक्रीत बिल्डरची 25 लाखांची फसवणूक, रिअल इस्टेट व्यावसायिकावर FIR

0

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | जमीन विक्री व्यवहारात एका रिअल इस्टेट व्यावसायिकाने बांधकाम व्यावसायिकाची आर्थिक फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. रिअल इस्टेट व्यावसायिकाने समजुतीचा करारनामा करुन व्यवहार पूर्ण न करता बांधकाम व्यावसायिकाची 25 लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार रावेत येथे 31 ऑक्टोबर 2023 ते 24 जून 2024 या कालावधीत घडला आहे.

नामदेव शंकर पोटे (वय 75, रा. संभाजीनगर एम.आय.डी.सी, चिंचवड) यांनी याप्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात (Ravet Police Station) फिर्याद दिली. बाळासाहेब दत्तात्रय गवारे Balasaheb Dattatray Gaware (वय 50, रा. बिजलीनगर, चिंचवड) याच्याविरोधात पोलिसांनी आयपीसी 420 नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोटे बांधकाम व्यावसायिक आहेत. तर बाळासाहेब गवारे याचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे.

गवारे याने रावेत येथील सर्व्हे नं. 77/9 मधील 40 गुंठे मिळकत नामदेव पोटे यांना खरेदी करून देण्याबाबत समजुतीचा करारनामा केला. त्यासाठी गवारे यांनी पोटे यांच्याकडून 25 लाख रुपये घेतले. त्यानंतर जमिनीचा व्यवहार पूर्ण न करता त्यांना जमीन खरेदी करून दिली नाही. गवारे याने पोटे यांच्याकडून घेतलेले पैसे परत न देता त्यांची फसवणूक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र कदम (Sr PI Mahendra Kadam) तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.