Nitin Gadkari On Highway Toll | टोल क्रांतीवर विचार करत आहेत नितीन गडकरी, करावा लागेल एक कागद, नंतर कोणीही अडवणार नाही ‘टोल-गेट’वर

0

नवी दिल्ली : Nitin Gadkari On Highway Toll | आगामी काळात टोल रोडचा वापर करण्यासाठी वाहन चालकांना मासिक पास जारी जार करण्याबाबत विचार केला जात आहे. हा पास भारतीय रेल्वेद्वारे आपल्या दैनिक प्रवाशांना देण्यात येत असलेल्या मंथली सीझन तिकिट म्हणजे एमएसटी प्रमाणे असेल. यामुळे टोल चोरी थांबवल्याने सरकारी खजिन्यात जास्त पैसे येतील.

नवी दिल्लीत ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टमवर Global Navigation Satellite Systems (GNSS) झालेल्या एका इंटरनॅशनल वर्कशॉपमध्ये केंद्रीय रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी टोल नाक्यांसाठी कार धारकांना मासिक आणि वार्षिक पास जारी करण्याबाबत विचार व्यक्त केले.

नितीन गडकरी म्हणाले, कार धारकांना मासिक आणि वार्षिक पास करण्याबाबत मंत्रालयाचे सेक्रेटरी अनुराग जैन आणि एनएचएआयचे चेयरमन संतोष कुमार यादव यांनी विचार केला पाहिजे. या वर्कशॉपमध्ये अनेक देशांमधून तज्ज्ञ सुद्धा आले होते. कशा प्रकारे भारतात टोल नाक्यांवर गाड्या न थांबवता त्यांच्याकडून सॅटेलाईट आधारित टोल घेतला जाईल, यावर वर्कशॉपमध्ये विचार करण्यात आला.

नितीन गडकरी यांनी म्हटले की, या महिन्याच्या सुरुवातीला एनएचएआयने राष्ट्रीय राज्यमार्गांवर उपग्रह-आधारित इलेक्ट्रॉनिक टोल संग्रहासाठी जगभरातून प्रस्ताव मागवले होते. राष्ट्रीय महामार्गांवर फिजिकल टोल बूथ बंद करणे, हा यामागील उद्देश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.