Maharashtra Politics News | मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठकांचा धडाका सुरु; वर्षा बंगल्यावर मोठ्या हालचाली

0

मुंबई : Maharashtra Politics News | यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठे यश मिळाल्याने त्यांची ताकद वाढली आहे. शुक्रवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. दरम्यान मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये वर्षा बंगल्यावर बैठकांचा धडाका सुरु आहे. यामध्ये राज्यपालनियुक्त विधानपरिषद सदस्य आणि मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

अधिवेशनात विरोधक विविध मुद्यांवर आक्रमक होत सरकाराला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील, त्याला महायुती (Mahayuti) म्हणून कसं सामोरे जायचं यावर रणनीती आखण्यात आली आहे. मंत्रिमंडळ विस्तार हा अधिवेशनानंतर घेतला जाणार असल्याचे महायुतीच्या बैठकीत ठरले आहे. हा मंत्रिमंडळ विस्तार अधिवेशनापूर्वी होईल अशी चर्चा सुरु होती.

वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत विधानपरिषद निवडणूक, आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. विधान परिषदेच्या ११ जागांसाठी महायुतीतील अनेक मोठी नावं इच्छुक आहेत. त्यामुळे आता संधी कोणाला द्यायची? आणि त्यानंतर इतरांची नाराजी दूर कशी करायची? हा मोठा प्रश्न असणार आहे. या अनुषंगाने बैठकीत चर्चा झालेली असू शकते, असं बोललं जात आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य विधिमंडळाचे हे शेवटचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधक आणि सत्ताधारी यांच्यासाठी महत्वाचे ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.