Lok Sabha Speaker | अध्यक्षपदाचे उमेदवार ओम बिर्ला आणि के. सुरेश यांच्यापैकी कोण जास्त श्रीमंत, जाणून घ्या दोघांची कुठे-कुठे प्रॉपर्टी?

0

नवी दिल्ली : देशाच्या इतिहासात प्रथमच संसदेच्या अध्यक्ष पदासाठी निवडणूक (Loksabha Speaker Election) होत आहे. एकीकडून जिथे NDA आघाडीकडून पुन्हा एकदा ओम बिर्ला (Om Birla Nomination) यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला आहे, तर विरोधी INDIA आघाडीने के. सुरेश (K Suresh) यांना मैदानात उतरवले आहे. यासाठी बुधवारी मतदान होत आहे. ओम बिर्ला राजस्थानच्या कोटामधून लोकसभा निवडणुकीत विजयी होऊन संसदेत पोहोचले आहेत. तर कोडिकुन्निल सुरेश केरळच्या मवेलीकरा जागेवर विजयी होऊन आले आहेत. दोघांच्या नेटवर्थबाबत बोलायचे तर या बाबतीत भाजपाचे ओम बिर्ला खुप पुढे आहेत. दोघांकडे किती संपत्ती आहे ते जाणून घेऊया…

लोकसभा अध्यक्षपदाचे एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला यांनी लोकसभा निवडणूक २०२४ च्या दरम्यान निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे. त्यानुसार, ओम बिर्ला यांची नेटवर्थ १०.६२ कोटी रुपये आहे, तसेच त्यांच्यावर कोणतेही कर्ज नाही. त्यांच्याकडे ४०,००० रुपये कॅश आहे, तर पत्नीकडे ३०,००० रुपये रोख आहेत.

ओम बिर्ला यांनी शेयरमध्ये लावले इतके पैसे

ओम बिर्ला यांच्या जंगम मालमत्तेबाबत बोलाचे तर, त्यांच्या बँक खात्यात १.३२ कोटी रुपये जमा आहेत, तर पत्नीच्या बँक खात्यात जमा रक्कम सुमारे ९४ लाख रुपये आहे. याशिवाय त्यांनी शेयरमध्ये सुद्धा गुंतवणूक केली आहे. त्यांनी हितकारी विद्यालय सहकारी शिक्षण समिती लिमिटेडसह इतर शेयरमध्ये सुमारे १.०८ कोटी रुपये लावले आहेत. मात्र, त्यांनी एनएसएस, पोस्ट बचत, एलआयसीमध्ये कोणतीही बचत केलेली नाही. तर पत्नी जवळ सुमारे ४३,००० रुपयांची एक एलआयसी पॉलिसी आहे.

ओम बिर्ला याच्या पत्नीच्या नावावर तिन घरे

ओम बिर्ला यांच्याकडे एक वॅगन-आर कार, तर पत्नीकडे रिट्ज कार आहे आणि दोन्हीचे मूल्य सुमारे ५ लाख रुपये आहे. ओम बिर्लांकडे ८ लाख रुपयांचे सोने-चांदी आहे. तर त्यांच्या पत्नीकडे ४२६ ग्रॅम सोने (सुमारे ९६ लाख रुपये) आहे.

स्थावर मालमत्तेत ओम बिर्ला आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर सुमारे ७५ लाखांची शेत जमीन आहे. मात्र, ओम बिर्ला यांच्या नावावर कोणतेही घर नाही, तर त्यांच्या पत्नीच्या नावावर तीन घरे आहेत. त्यांची एकुण किमत ४.४९ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

संपत्तीत ओम बिर्ला यांच्या पाठीमागे के सुरेश तर दूसरीकडे लोकसभा अध्यक्षपदाचे इंडिया आघाडीचे उमेदवार के सुरेश संपत्तीच्या बाबतीत ओम बिर्ला यांच्या खुप पाठीमागे आहेत. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, के सुरेश यांची एकुण मालमत्ता सुमारे १.५ कोटी रुपये आहे आणि त्यांच्यावर जवळपास ८ लाख रुपयांचे कर्ज सुद्धा आहे. त्यांच्याकडे १५ हजार रुपये कॅश, पत्नी आणि मुलांच्या सर्व बँक खात्यात १७.६२ लाख रुपये होते. शेयर, बाँड अथवा इतर कोणत्याही बचत खात्यात त्यांची गुंतवणूक नाही. के सुरेश यांच्या नावावर तीन एलआयसी पॉलीस आहेत.

७५ लाखांची जमीन आणि २० लाखांचे घर!

के सुरेश यांच्याकडे एक इनोव्हा कार, एक फोर्ड फिगो कार आहे. दोन्हीची किमत २५ लाख रुपये आहे. के सुरेश यांच्याकडे ८ ग्रॅमची सोन्याची एक अंगठी आहे, तर पत्नीकडे ६ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आहेत. स्थावर मालमत्तेत के सुरेश यांच्याकडे ७५ लाख रुपयांची शेतजमीन आहे. तर २० लाख रुपये किमतीचे एक घर त्यांच्या नावावर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.