LIC Advisory To Policyholders | LIC कडून पॉलिसीधारकांना सूचना, विमा पॉलिसीच्या नावावर फसवणुकीपासून केले सावध, जाणून घ्या हे कोण करतंय

0

नवी दिल्ली : LIC Advisory To Policyholders | देशभरात भारतीय आयुर्विमा महामंडळाचे कोट्यवधी पॉलिसीधारक आहेत. या सर्व ग्राहकांच्या हितासाठी एलआयसीने एक महत्वाची सूचना जारी केली आहे. लाईफ इन्श्युरंस कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आपल्या पॉलिसी धारकांना त्यांच्या इन्श्युरंस पॉलिसीशी संबंधीत अनाधिकृत ट्रांजक्शनबाबत सावध केले आहे.

काही कंपन्या पॉलिसी सरेंडर करण्याच्या नावाखाली एलआयसी पॉलिसी होल्डर्सकडून पॉलिसी मिळवू पाहात आहेत. या प्रकरणात एलआयसीने स्पष्ट केले की ते या एंटिटीज अथवा त्यांच्या या ऑफरिंगशी अ‍ॅफिलिएटेड नाहीत. या प्रकरणानंतर एलआयसीने काही सूचना जारी केल्या आहेत.

अशी अनेक वृत्तं समोर आली आहेत, ज्यामध्ये लोकांना मोठी रक्कम देण्याचा विश्वास दाखवून त्यांची सध्याची एलआयसी इन्श्युरंस पॉलिसी खरेदी करण्याचे अमिष दाखवले जात आहे. अशाप्रकारे लोक आपल्या विमा कंपनीला पॉलिसी सरेंडर न करता, त्यांना चुकीच्या पद्धतीने विकत आहेत. या प्रकरणात एलआयसीने आपली स्थिती स्पष्ट केली आहे.

एलआयसीने पॉलिसीधारकांच्या हितासाठी केलेल्या वक्तव्यात म्हटले आहे की, एलआयसीचा असे कोणतेही यूनिट, अथवा संस्थेद्वारे सादर करण्यात येत असलेले प्रॉडक्ट आणि/अथवा सर्विसेसशी संबंध नाही. एलआयसीचे माजी कर्मचारी/कामगारांद्वारे केलेले कोणतेही वक्तव्य अशा व्यक्तींसाठी व्यक्तीगत आहे. याबाबत आम्ही कोणत्याही प्रकारची जबाबदारी अथवा कर्तव्य नाकारतो.

या सर्व पॉलिसीधारकांना विनंती आहे की, त्यांनी आपल्या पॉलिसीवर कोणताही निर्णय घेण्यापूवी पूर्ण सावधगिरी बाळगावी, ज्यामुळे त्यांची आर्थिक सुरक्षा आणि त्यांच्या कुटुंबाचे जोखीम संरक्षण धोक्यात येऊ शकते. कोणत्याही ऑफरला उत्तर देण्यापूर्वी, कृपया आमच्या शाखांमध्ये कोणत्याही एलआयसी अधिकारी वर्गाशी संपर्क साधून सल्ला घ्या.

Leave A Reply

Your email address will not be published.