Gautami Patil News Song | गौतमी पाटील आणि सुशांत पुजारी यांच्या घे दमानं गाण्याला एक मिलियन व्हिव

0

नृत्यदिग्दर्शक रेमो डिसुझा यांनी केले गाण्याचे कौतुक

एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Gautami Patil News Song | गौतमी पाटील आणि सुशांत पुजारीचे “घे दमानं” हे नवे गाणे काहीदिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आले असून, अल्पावधीतच हे गाणे रसिकांच्या पसंतीस उतरले असून या गाण्याला अवघ्या ५ दिवसात १ मिलियन पेक्षा जास्त रसिकांनी पहिले आहे. “घे दमानं”या गाण्याच्या माध्यमातून गौतमी पाटील हि नेहमीपेक्षा वेगळ्या रूपात रसिकांच्या समोर आली असून रसिकांनी या लूक बद्दल तिचे कौतुक केले आह, तिच्या जोडीला ए बी सी डी, ए बी सी डी २, स्ट्रीट डान्सर अश्या विविध कलाकृतीतून रसिकांसमोर आलेला अभिनेता व डान्सर,नृत्यदिग्दर्शक सुशांत पुजारी देखील आहे.

सिनेशाईन एंटरटेनमेंटचे श्रीनिवास कुलकर्णी आणि अमोल घोडके यांनी “घे दमानं” या गाण्याची निर्मिती केली असून, गाण्याचे संगीत शैलेश चंद्र लोखंडे यांचे असून, गायक हर्षवर्धन वावरे व कविता राम यांनी या गाण्याला स्वरसाज चढवला आहे, या गाण्याचे दिग्दर्शन राहुल झेंडे यांनी केले असून पुण्यकर उपाध्याय यांनी गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे, तर कॅमेरा वर्क मनोज काकडे यांनी केले आहे, पुण्यातील पी बी ए फिल्म सिटी या निसर्गरम्य ठिकाणी या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आलं आहे.

गाण्यामधून गौतमी पाटील नेहमीपेक्षा वेगळ्या रूपात रसिकांच्या समोर आली असून रसिकांकडून तिच्या या लूकचे कौतुक होत आहे, एका रसिकाने कमेंट करत म्हणले कि “आजवर पाहिलेल्या गौतमीच्या गाण्यांपैकी या गाण्यातला तिचा लूक तिचे एक्सप्रेशन्स अतिशय सुंदर आहेत, हे गाणं पाहिल्यानंतर निर्माते नक्कीच अभिनेत्री म्हणून तिचा विचार करतील”, तर अंकी एका रसिकाने म्हणले कि “हे गाणं पाहिल्यानंतर हि गौतमी आहे यावर विश्वास बसला नाही, यापुढे स्वतःही कला उठून दिले अश्या पद्धतीची गाणी गौतमीने केली पाहिजेत”. दरम्यान बॉलिवूड चे प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसुझा यांनी देखील गाण्याचे कौतुक केले असून गाणं पाहून इंस्टाग्रामच्या माध्यमातून त्यांनी गाण्याचं कौतुक केलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.