Dheeraj Ghate On Pubs In Pune | पुण्यातून पब संस्कृती हद्दपार करा, नाहीतर रस्त्यावर उतरु – धीरज घाटे (Video)

0

पुणे : Dheeraj Ghate On Pubs In Pune | पुण्यातून पब संस्कृती तातडीने हद्दपार करा. यामुळे पुण्याची प्रतिमा मलिन होते आहे. पब संस्कृतीतील अवैध कामांशी सामान्य पुणेकरांचा काहीही संबंध नाही. पण त्यामुळे पुणेकर बदनाम होत आहेत. पोलिसांनी यामध्ये तातडीने गंभीर पावले उचलली पाहिजेत आणि कारवाई केली पाहिजे. नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरून हे सगळं बंद करू, असा इशारा सोमवारी दिला.

पुण्यात फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील (FC Road Pune) एका पबमध्ये (L3 – Liquid Leisure Lounge) अमली पदार्थांचे सेवन होत असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर याच पब बाहेर सोमवारी पुणे शहर भाजपाने निदर्शने केली. राज्यातील महायुती सरकारने वेळोवेळी आदेश आणि सूचना देऊनही पुण्यातील पोलिसांकडून आणि प्रशासनाकडून पबवर आवश्यक कारवाई होत नाही. या पबमध्ये सुरू असलेल्या अवैध कामांवर कारवाई होत नाही. त्यामुळे नाहक पुण्याची प्रतिमा मलिन होते आहे.

वास्तविक पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. सांस्कृतिक राजधानी आहे. अनेक मान्यवर मंडळी या शहरात वास्तव्याला आहेत. पण गेल्या काही महिन्यात उघडकीस आलेल्या घटनांमुळे पुण्याची प्रतिमा मलिन झाली आहे. यामध्ये पोलिसांनी आणि प्रशासनाने जबाबदारी घेतली पाहिजे. पब संस्कृतीला सामान्य पुणेकर वैतागले आहेत. काही रहिवाशांनी पबमुळे आपले राहते घर सोडले आणि ते दुसरीकडे शिफ्ट झाले. ही वेळ त्या सामान्य पुणेकरांवर का आली, याचाही विचार पोलिसांनी केला पाहिजे.

पुणे पोलिस गणेशोत्सवात घड्याळाचे काटे दाखवत सामान्य कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा देतात. मग इतक्या राजेरोसपणे रात्री उशिरापर्यंत पुण्यात पब कसे काय सुरू असतात, असा प्रश्न पडतो. गेल्याच आठवड्यात आम्ही शाळांबाहेरील टपऱ्यावर कारवाई करा. तेथून विद्यार्थ्यांना तंबाखूजन्य पदार्थ विकले जातात. त्यामुळे त्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी केली होती. आता पुन्हा अमली पदार्थांचा व्हिडिओ समोर आला आहे.

हा विषय अत्यंत गंभीर असून, पोलिसांनी पुण्यातून पब संस्कृतीच हद्दपार केली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. जर पोलिसांनी सगळ्यांना दिसेल अशी कारवाई पब संस्कृतीविरोधात केली नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशाराही दिला. यावेळी भाजपाचे पुणे शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.