Cashback On Gas Cylinder Booking | LPG सिलेंडरच्या बुकिंगवर मिळेल 10 टक्के कॅशबॅक, केवळ घ्यावे लागेल हे क्रेडिट कार्ड

0

नवी दिल्ली : Cashback On Gas Cylinder Booking | जर तुम्ही ऑनलाईन स्वयंपाकांचा गॅस सिलेंडर (LPG Cylinder) ची बुकिंग करत असाल आणि निश्चिक कॅशबॅक मिळवायचा असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. मार्केटमधील काही क्रेडिट कार्ड (Credit Card) चा वापर करून एलपीजी सिलेंडरच्या बुकिंगवर काही कॅशबॅक मिळवू शकता. एलपीजी सिलेंडरच्या बुकिंगवर १० टक्के कॅशबॅक देत असलेल्या काही क्रेडिट कार्ड (Credit Card) ची माहिती घेऊया.

डिजिटल पेमेंटची सुविधा देणारे एयरटेल थँक्स अ‍ॅप (Airtel Thanks App) द्वारे ग्राहक एलपीजी सिलेंडरच्या बुकिंगवर १० टक्केपर्यंत कॅशबॅक मिळवू शकता, परंतु १० टक्के कॅशबॅक मिळवण्यासाठी ग्राहकांना गॅस बुकिंगचे पेमेंट एयरटेल अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डने करावे लागेल.

गॅस बुकिंगवर होईल ८० रुपयांची बचत
सध्या दिल्लीत १४.२ किलोग्रॅमच्या गॅस सिलेंडरची किंमत ८०३ रुपये आहे. परंतु एयरटेल थँक्स अ‍ॅपद्वारे एलपीजी सिलेंडरचे बुकिंग आणि एयरटेल अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला १० टक्के (८० रुपये) कॅशबॅक मिळेल. अशाप्रकारे १४.२ किलोग्रॅमचा गॅस सिलेंडर तुम्हाला ७२३ रुपयांना पडेल.

Airtel Thanks App द्वारे असे करा गॅस बुकिंग

  • आपले Airtel Thanks App ओपन करा.
  • यानंतर होम पेजवर खाली दिसत असलेल्या PAY आयकॉनवर क्लिक करा.
  • आता Recharge & Pay Bills सेक्शनमध्ये Book Cylinder वर क्लिक करा.
  • यानंतर Select Operator वर क्लिक करा.
  • आता Select ID निवडा. कंझ्यूमर नंबर अथवा मोबाईल नंबर अथवा यूनिक कस्टमर आयडी टाका.
  • यानंतर Proceed वर क्लिक करा.
  • आता बुकिंग अमाऊंट सिस्टमद्वारे सांगितली जाईल.
  • यानंतर Pay Now वर क्लिक करा.
  • आता Airtel Axis Bank Credit Card द्वारे पेमेंट करा जेणेकरून १० टक्के कॅशबॅक मिळेल. हे कॅशबॅक तुमच्या एयरटेल अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डच्या अकाऊंटमध्ये क्रेडिट केले जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.