Adani Group | अदानी ग्रुपच्या नावावर होणार सिमेंट इंडस्ट्रीचा मुकुट! नंबर-1 बनण्यासाठी काय आहे कंपनीचा प्‍लान?

0

नवी दिल्ली : Adani Group | अदानी ग्रुप देशाच्या सिमेंट इंडस्ट्रीमध्ये वेगाने पुढे जात आहे. मागील काही दिवसात अदानी समुहाने अनेक सिमेंट कंपन्यांचे अधि‍ग्रहण केले आहे. मीडिया रिपोर्ट आणि नुवामा इन्स्‍टीट्यूशन इक्विटीच्या तज्ज्ञांनुसार अदानी समुह आगामी काळात आणखी काही सिमेंट कंपन्या खरेदी करण्यासाठी ३ बिलियन डॉलरचा फंड तयार करत आहे. हा फंड तयार करण्याचा हेतु म्हणजे तीन ते चार वर्षात या सेक्‍टरची नंबर-१ कंपनी बनण्याचा आहे.

समुहाकडून आगामी काळात सौराष्ट्र सिमेंट, वेदराज सिमेंट आणि जयप्रकाश असोसिएटचे सिमेंट कारखाने खरेदी करू शकते.

एक ब्रोकरेज फर्मच्या म्हणण्यानुसार, अंबुजा सिमेंट (Ambuja Cement) ची आर्थिक स्थिती मजबूत आहे आणि आगामी काळात ती आणखी अधि‍ग्रहण करू शकते. तज्ज्ञांनी अंबुजा सिमेंटचे शेयर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शेयरमध्ये आणखी तेजी येण्याची शक्यता आहे.

१४ जून रोजी हा शेयर ६९० रुपयांच्या विक्रमी हाय वर पोहोचला होता. २१ जून रोजी बंद झालेल्या आठवड्यात शेयर ६५९ रुपयांच्या लेव्हलवर बंद झाला होता. मागील काळात अंबुजा सिमेंटकडून घोषणा करण्यात आली होती की त्यांनी पेना सिमेंटचे अधि‍ग्रहण करण्यासाठी १०,४०० कोटी रुपयांचा करार केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.