NDA Modi Cabinet | मोदी कॅबिनेटची शेतकऱ्यांना आणखी एक भेट, 14 पिकांची MSP वाढवली

0

नवी दिल्ली : NDA Modi Cabinet | मोदी कॅबिनेटने १४ पिकांची एमएसपी वाढवली आहे. मोदी कॅबिनेटच्या कालच्या महत्वाच्या बैठकीत सरकारने १४ पिकांची एमएसपी वाढवण्याबाबत निर्णय घेतला. एनडीए ३.० ची बुधवारी दुसरी कॅबिनेट बैठक झाली. ज्यामध्ये सरकारने पाच मोठे निर्णय घेतले. शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत सरकारने १४ पिकांचे किमान आधारभूत मूल्य वाढवण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी ही माहिती दिली.

धान्यावर ११७ रुपये वाढवले, जे आता २३०० रुपये प्रति क्विंटल केले. धान्याची एमएसपी २३०० रुपये प्रति क्विंटल असेल, जी मागील वर्षाच्या तुलनेत ११७ रुपये जास्त आहे. तुरीची एमएसपी ७५५० रुपये प्रति क्विंटल असेल, जी मागील वर्षाच्या तुलनेत ५५० रुपये जास्त आहे. उडदाची एमएसपी ७४०० रुपये प्रति क्विंटल असेल, जी मागील वर्षाच्या तुलनेत ४५० रुपये जास्त आहे.

तसेच मुगाची एमएसपी ८६८२ रुपये प्रति क्विंटल असेल जी मागील वर्षाच्या तुलनेत १२४ रुपये जास्त आहे. कापसाची नवीन एमएसपी ७१२१ असेल. तर त्याच्या इतर वर्गासाठी नवीन एमएसपी ७५२१ रुपये असेल, जी पूर्वीपेक्षा ५०१ रुपये जास्त आहे.

भूईमुगची एमएसपी ६७८३ रुपये प्रति क्विंटल असेल, जी मागील वर्षापेक्षा ४०६ रुपये जास्त आहे. अशाप्रकारे ज्वारीची एमएसपी ३३७१ रुपये प्रति क्विटंल असेल जी मागील वर्षापेक्षा १९१ रूपये जास्त आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.