Deposits Of Indians In Swiss Bank | कुठे गेला स्वीस बँकेत ठेवलेला भारतीयांचा पैसा? 4 वर्षात बदलले चित्र, विक्रमी स्तरावर कमी झाले धन

0

नवी दिल्ली : Deposits Of Indians In Swiss Bank | स्वीस बँकेत ठेवलेला भारतीयांचा पैसा ७०% घसरून मागील चार वर्षात विक्रमी खालच्या स्तरावर आला आहे. हा खुलासा स्वीस नॅशनल बँकेने भारताच्या स्थानिक शाखा आणि इतर आर्थिक स्थांच्या माध्यमातून स्वीस बँकांमध्ये जमा पैशाच्या आकड्यांच्या माध्यमातून केला आहे. (Swiss Bank Data)

स्विझर्लंडच्या केंद्रीय बँकेने गुरूवारी जारी केलेल्या वार्षिक आकड्यांनुसार, भारतीय व्यक्ती आणि कंपन्यांनी जमा केलेला पैसा, २०२३ मध्ये ७० टक्केच्या जोरदार घसरणीसह चार वर्षातील खालचा स्तर १.०४ अरब स्वीस फ्रँक (९,७७१ कोटी रुपये) वर आला आहे. तो २०२१ मध्ये १४ वर्षाच्या उच्च स्तर ३.८३ अरब स्वीस फ्रँकवर पोहोचला होता.

स्वीस नॅशनल बँकेनुसार, २०२३ च्या अखेरीस स्वीस बँकांच्या भारतीय ग्राहकांना एकुण दायित्व १०३.९८ कोटी स्वीस फ्रँक आहे. यामध्ये ग्राहक ठेवींमध्ये ३१ कोटी स्वीस फ्रँक (२०२२ च्या अखेरीस ३९.४ कोटी स्वीस फ्रँकपेक्षा कमी), इतर बँकांच्या माध्यमातून ठेवलेल्या ४२.७ कोटी स्वीस फ्रँक (१११ कोटी स्वीस फ्रँकपेक्षा कमी), ट्रस्टच्या माध्यमातून एक कोटी स्वीस फ्रँक (२.४ कोटी स्वीस फ्रँकपेक्षा कमी) आणि बाँड, रोखे आणि विविध इतर आर्थिक साधनांद्वारे ग्राहकांना देय इतर रक्कमेच्या रूपात ३०.२ कोटी स्वीस फ्रँकचा (१८९.६ कोटी स्वीस फ्रँकपेक्षा कमी) समावेश आहे.

कुठे गेला पैसा?
स्वीस नॅशनल बँकेच्या आकड्यानुसार, घसरणीचे मुख्य कारण बाँड, रोखे आणि विविध इतर आर्थिक साधनांच्या माध्यमातून ठेवलेल्या पैशात मोठी घसरण. ग्राहकांच्या ठेवी खात्यात जमा रक्कम आणि भारतात इतर बँकांच्या शाखांच्या माध्यमातून ठेवलेल्या पैशात सुद्धा घसरण झाली आहे.

हे स्वीस नॅशनल बँकेद्वारे सांगण्यात आलेले अधिकृत आकडे आहेत आणि याचा स्वीझर्लंडमध्ये भारतीयांनी ठेवलेल्या कथित काळ्यापैशाशी कोणताही संबंध नाही. या आकड्यांमध्ये त्या पैशाचा देखील समावेश नाही, जो भारतीयांनी, एनआरआय अथवा इतर लोकांनी अन्य देशाच्या संस्थांच्या नावावर स्वीस बँकांमध्ये जमा केला आहे.

स्वीस नॅशनल बँकेनुसार, भारतीयांनी ठेवलेली एकुण रक्कम २००६ मध्ये ६.५ अरब स्वीस फ्रँकच्या विक्रमी उच्च स्तरावर होती. यानंतर २०११, २०१३, २०१७, २०२० आणि २०२१ मध्ये काही वर्षे वगळता ती बहुतांश कमी होताना दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.