NDA Modi Cabinet Meeting | 76000 कोटी रुपये खर्च करून मोदी सरकार महाराष्ट्रात येथे बनवतेय पोर्ट, 12 लाख रोजगार मिळण्याचा दावा

0

नवी दिल्ली : NDA Modi Cabinet Meeting | पंतप्रधान नेतृत्वात झालेल्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रासाठी मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने महाराष्ट्राच्या पालघरमध्ये वाढवन बंदराला (Vadhavan Port) मंजूरी दिली आहे. हा प्रोजेक्ट ७६२०० कोटी रुपयांचा असेल. येथे कंटेनरची कॅपेसिटी २० मिलियन Teu असेल. यातून बंदराच्या जवळपासच्या क्षेत्रात १२ लाख रोजगारांची निर्मिती होईल.

या बंदराच्या जवळपास रेल्वे आणि विमानतळाशी चांगली कनेक्टिव्हिटी असेल. देशात एका मोठ्या प्रोजेक्टला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. येथे ९ कंटेनर टर्मिनल असतील आणि मेगा कंटेनर पोर्ट असेल. या बंदराचा पहिला टप्पा २०२९ मध्ये पूर्ण होईल. हे बंदर जगातील १० मध्ये असेल, असा दावा करण्यात आला आहे. हे बंद मुंबईपासून सुमारे १५० किलोमीटर अंतरावर आहे.

सरकारने म्हटले की, या बंदराच्या निर्मितीसाइी प्रत्येक स्टेकहोल्डर सोबत चर्चा करण्यात आली आहे. बंदराच्या डिझाईनमध्ये बदल करण्यात आला आहे आणि आता ते स्थानिक लोकांच्या फायद्याच्या हिशोबाने तयार केले जाईल. विशेष म्हणजे हे बंदर इंडिया मिडल ईस्ट कॉरिडोरसाठी अतिशय महत्वाचे ठरेल. या बंदरावर कोस्ट गार्डचा वेगळा बर्थ असेल. याशिवाय एक फ्यूएल बर्थ सुद्धा असेल.

वृत्तानुसार, हे बंदर जवाहर लाल नेहरू पोर्ट अथॉरिटी (JNPT) आणि महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डद्वारे मिळून बनवले जात आहे. यामध्ये जेएनपीटीची भागीदारी ७४ टक्के आणि महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाची २६ टक्के भागीदारी असेल.

Leave A Reply

Your email address will not be published.