Narhari Zirwal | अजित पवार गटात घुसमट?; नरहरी झिरवाळ यांचा शरद पवारांकडे ओढा

0

दिंडोरी : Narhari Zirwal | महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) नवनवीन ट्विस्ट येत आहेत. लोकसभेच्या निकालानंतर विविध घटनाक्रम येथे घडत आहे. लोकसभेच्या निकालानंतरपासून अजित पवार गटामध्ये (Ajit Pawar NCP) अस्वस्थता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. विरोधकांनी तर अजित पवार गटातील काही आमदार बाहेर पडतील आणि पुन्हा शरद पवारांकडे येतील अशी शक्यता व्यक्त केलेली आहे.

अशातच मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटामध्ये छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाराज असल्याची चर्चा आहे. मात्र आता आणखीन एका आमदाराने स्वत:च्या वाढदिवासानिमित्त घेतलेल्या एका निर्णयामुळे आणि या आमदाराच्या वाढदिवसाच्या जाहिरातींमुळे हा आमदार अजित पवार गट सोडणार का याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये छगन भुजबळ वेगळा निर्णय घेण्याच्या परिस्थितीमध्ये असतानाच आता अजित पवारांबरोबर गेलेल्या आमदारांपैकी एक असलेले दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांनीही आपल्या वाढदिवसाला शरद पवारांचे फोटो छापले आहेत.

आज नरहरी झिरवाळ यांचा वाढदिवस असल्याने काही वर्तमानपत्रात शरद पवारांचा (Sharad Pawar) फोटो छापण्यात आला आहे तर काही वर्तमानपत्रांमध्ये जाहिरातीत एक रिकामी पांढरी चौकट ठेवण्यात आली आहे. ही चौकट कुणासाठी? या चौकटीत कुणाचा फोटो येणार? नरहरी झिरवाळ पण वेगळा मार्ग स्वीकारणार का? अशा विविध चर्चांना यामुळे उधाण आलं आहे.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे विविध कारणांमुळं चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी भास्कर भगरे यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या एका बैठकीत नरहरी झिरवळ यांची उपस्थिती पाहायला मिळाली होती. त्यावरुन देखील राज्यभरात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.