Low Cost Humanoid Robot | आज्ञाधारक पत्नीप्रमाणे स्वयंपाक-पाणी करतील रोबोट, नंतर दिवसभर सांभाळतील मुलांना, लवकरच येईल असा काळ

0

नवी दिल्ली : Low Cost Humanoid Robot | टेक्सासच्या ऑस्टिनमध्ये टेस्लाची वार्षिक शेयरहोल्डर्स मीटिंग झाली. या मीटिंगमध्ये टेस्लाचे मालक एलन मस्क (Elon Musk) यांनी खुप आश्चर्यकारक वक्तव्य केले. ते म्हणाले, तुम्ही लवकरच एक ऑटोनॉमस ह्यूमनॉईड रोबोट खरेदी करण्याचा विचार कराल, जो तुमचे घर-आंगण स्वच्छ केल्यानंतर तुमच्या मुलांची देखभाल (बेबी-सिटिंग) करेल. हा रोबोट तुम्हाला एका स्वस्त कारच्या किमतीत मिळेल. हेच भविष्य आहे.

मस्क यांनी म्हटले की, टेस्लाचा ऑप्टीमस रोबोट, जो २०२१ मध्ये पहिल्यांदा समोर आणण्यात आला होता, तो एक ह्यूमनॉयड रोबोट आहे. हा रोबोट तुमच्या इच्छेप्रमाणे सर्व काही करू शकतो. तो तुमचा सहकारी होऊ शकतो. तो तुमच्या घरी राहू शकतो, तो तुमच्या मुलांची काळजी घेण्यासह, त्यांना शिकवू देखील शकतो.

या रोबोटकडून कारखान्यात काम देखील करून घेता येईल. थोड्या सोप्या शब्दात सांगायचे तर हा रोबोट एक असा मजूर आहे, ज्याच्याकडून तुम्ही कारखान्यात रोजंदारी करून घेऊ शकता अथवा घरातील घरकाम करून घेऊ शकता. तो तुमच्या आदेशावर प्रत्येक काम करेल.

सध्या काय करतोय ऑप्टीमस रोबोट?
एलन मस्क जेव्हा मीटिंगदरम्यान स्टेजवर आले तेव्हा ‘मस्क-मस्क’च्या घोषणा दिल्या जात होत्या. भारतात असे वातावरण साधारपणे राजकीय सभांमध्ये दिसते अथवा एखाद्या रॉकस्टारच्या कॉन्सर्टमध्ये. मस्क यांनी स्टेजवर येऊन सांगितले की, ऑप्टीमस रोबोट सध्या टेस्लामध्ये इलेक्ट्रिक कार बनवण्याच्या कामात गुंतला आहे. त्यांच्याकडून विविध प्रकारची कामे करून घेतली जात आहेत. यावेळी मस्क यांच्या प्रत्येक वाक्यावर जोरजोरात टाळ्या आणि शिट्ट्या वाजत होत्या.

अरबपती एलन मस्क यांनी अंदाज वर्तवला की, जेव्हा एआयची शक्ती घेऊन ह्यूमनॉईड रोबोट बाजारात येतील तेव्हा ते जगातील प्रत्येकाकडे असतील. असे झाल्यास टेस्लाचे व्हॅल्यूएशन २५ ट्रिलियन डॉलर होईल. सध्या संपूर्ण अमेरिकेचा जीडीपी २७-२८ ट्रिलियनपेक्षा जास्त नाही. मस्क यांनी म्हटले की, रोबोटची किमत जवळपास १०,००० डॉलर (सुमारे साडे ८ लाख रुपये) असेल. एका कारपेक्षा सुद्धा स्वस्त.

कधी होईल रोबोट क्रांती?
मात्र, टेस्ला प्रमुखांनी हा रोबोट रिलीज होण्याची तारीख स्पष्ट केली नाही. ते म्हणाले, पुढील वर्षाच्या अखेरीस आम्ही त्याच्या मर्यादित प्रॉडक्शनपर्यंत वाटचाल करू आणि त्यानंतर हजारो रोबोट आमच्याच टेस्ला कंपनीत करत असतील.

Leave A Reply

Your email address will not be published.