Koregaon Bhima Pune Crime News | भिंत कोसळून दोन कामगारांचा मृत्यू तर तीन जखमी, कोरेगाव भीमा येथील घटना

0

कोरेगाव भीमा : – Koregaon Bhima Pune Crime News | शिरुर तालुक्यातील (Shirur Taluka) कोरेगाव भीमा येथील आय टी डब्ल्यू कंपनी (ITW Company) समोरील वाहनतळ लगत असलेली 15 फूट उंचीची भिंत कोसळली. यामध्ये भिंती शेजारी उभे असलेल्या एका कामगाराचा जगीच मृत्यू झाला तर एका कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर इतर तीन जण जखमी झाल्याची प्राथमिक महिती आहे. या दुर्घटनेत चारचाकी आणि दुचाकी गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या अपघातात राजीव कुमार व मंजित कुमार यांचा मृत्यू झाला तर बंडू विधाटे, विजय गायकवाड, सतीश कानगुडे हे जखमी झाले आहेत. कोरेगाव भीमा येथील आय टी डब्ल्यू कंपनीजवळ कामासाठी आलेले कामगार वाहनतळाजवळ उभे होते. त्यांच्या मागे असलेली भिंत सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास कोसळली. यामध्ये पाच कामगार दबले गेले. यामध्ये दोन कामगारांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. तसेच 8 दुचाकी, 2 सायकली व 2 चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले.

घटनेची माहिती मिळताच आमदार अशोक पवार यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तसेच ज्यांची जागा आहे त्या संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. जखमींवर तातडीने उपचार करण्यात येऊन त्याचा खर्च संबंधित मालकाकडून घ्यावा. तसेच पुढील धोकादायक भिंत ताडतडीने पाडण्याबाबत सूचना पोलीस वरिष्ठांशी व तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्याशी संपर्क साधून दिल्या.

घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस हवालदार आत्माराम तलोळे, पोलीस अंमलदार प्रतीक जगताप यांनी तत्काळ भेट देत घटना स्थळाची पाहणी करत पंचनामा केला.

Leave A Reply

Your email address will not be published.