Budget 2024 | अर्थमंत्री निर्माला सीतारमण टॅक्‍स पेयर्सला देतील मोठा दिलासा! प्राप्तीकरातील सवलतीची मर्यादा वाढून होईल ‘इतकी’

0

नवी दिल्ली : Budget 2024 | अर्थसंकल्पात एनडीए सरकारकडून (NDA Modi Govt) मध्यम वर्गाला दिला जाऊ शकतो. मनीकंट्रोलमध्ये प्रकाशित वृत्तानुसार सरकार जुलैमध्ये सादर होत असलेल्या अर्थसंकल्पात नवीन कर प्रणाली अंतर्गत सवलतीची मर्यादा सध्याच्या ३ लाखावरून वाढवून ५ लाख रुपये करण्याचा प्लान करत आहे. (Nirmala Sitharaman)

यापूर्वी अनेक मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, सरकारकडून यावेळेला काही विशेष वर्गाच्या इन्कम टॅक्समध्ये दिलासा दिला जाऊ शकतो. सरकारला अपेक्षा आहे की कर सवलत मर्यादा वाढवल्याने मध्यम वर्गातील लोकांना दिलासा मिळेल आणि ते पहिल्यापेक्षा जास्त खर्च करतील.

२०२० च्या अर्थसंकल्पा सरकारकडून सामान्य लोकांना दोन कर प्रणाली निवडण्याचा पर्याय दिला होता. करदात्याला जुनी कर प्रणाली आणि नवीन कर प्रणाली हे दोन पर्याय दिले. सरकार नवीन कर प्रणालीत ३०% हायर टॅक्स स्लॅब कमी करून २५% करण्याची शक्यता नाही. सरकारकडून जुन्या कर प्रणालीत कोणताही बदल करण्याचा प्लान नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.