BJP Dhanyawad Yatra In Maharashtra | भाजपा महाराष्ट्रात काढणार धन्यवाद यात्रा; राज्याचे नेतृत्व फडणवीसच करणार

0

नागपूर : BJP Dhanyawad Yatra In Maharashtra | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारच्या (NDA Modi Govt) पुढील पाच वर्षाच्या महाराष्ट्र विकासाच्या योजना महाराष्ट्रात आणण्यासाठी महायुतीचे सरकार (Mahayuti Govt) काम करेल असे वक्त्यव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केले आहे. दरम्यान, सर्व विधिमंडळ सदस्यांनी आणि प्रदेश भाजपाने देवेंद्र फडणवीस यांना सरकारमध्येच राहून संघटनेला मदत करण्याची विनंती केली असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

तसेच लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) मतांची आकडेवारी का घटली याबाबत विचारविनिमय करून आगामी विधानसभेला तोंड देणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. नागपूर येथे माध्यमांशी ते संवाद साधत होते.

लोकसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेल्या पाठबळाबद्दल धन्यवाद व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रात भाजपा धन्यवाद यात्रा काढणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या पुढील पाच वर्षात होणारी विकासकामे व योजनांचा लाभ महाराष्ट्रातील जनतेला व महाराष्ट्राच्या विकासासाठी व्हायला हवा.

महाराष्ट्रातील सर्व आमदार-खासदार, संघटनेतील सर्व पदाधिकारी जुलै महिन्यात धन्यवाद यात्रा काढणार आहे, ज्या मतदारांकडे आम्ही मत मागण्यासाठी जाऊ त्यांना मोदी सरकारच्या नवीन योजना देखील पोहचवणार आहोत असंही बावनकुळे यांनी सांगितलं.

दरम्यान, नाना पटोले (Nana Patole) इतक्या खालच्या स्तराला गेले आहे की शेतकऱ्याला पाय धुवायला लावत आहे. महाराष्ट्राला अशोभनीय प्रकार आहे. इंग्रजांच्या काळात ज्या पद्धतीने देश गुलामगिरीत होता, काँग्रेसने पुन्हा इंग्रजांचा काळ आणला आहे.

इंग्रजांच्या काळातील जी मानसिकता होती, ती नाना पटोले यांनी स्वीकारली आहे. नाना पटोले यांनी त्यांच्या पदाचा आणि व्यक्ती म्हणून स्वतःचा देखील अपमान केला आहे. नाना पटोले यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे असा टोला ही बावनकुळे यांनी पटोलेंना लगावला.

Leave A Reply

Your email address will not be published.